मोहने महिला मोर्चाचा लोकोपयोगी  उपक्रम आहे,-- आमदार नरेंद्र पवार

कल्याण ( प्रतिनिधी): भाजपच्या मोहने टिटवाळा मंडळ महिला मोर्च्या ने अटाळी परिसरातील नागरिकांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर हा लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल आमदार नरेंद्र पवार यांनी महिला कार्यकर्त्यांची वाहवा केली,
      महिला मोर्च्या आयोजित नेत्र चिकित्सा शिबीर  कार्यक्रमाचे उदघाटन कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार नरेंद्र पवार व कल्याण जिल्हा भाजपच्या महिला अध्यक्षा उज्वला दुसाने यांनी केले, यावेळी नगरसेविका उपेक्षा भोईर, मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, सरचिटणीस व माजी परिवहन सभापती रमेश कोणकर, शक्तीवान भोईर, गजानन हिरू पाटील शाळेचे अध्यक्ष नारायण पाटील, सरचिटणीस जनार्धन पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, विष्णू पवार, महिला जिल्हा पदाधिकारी मुजुमदार म्याडम, माधुरी जोशी, मल्लिका पुजारी,   स्मिता सारदेशपांडे, ऍड. स्वाती झिमूर, संतोष इंगोले, बल्यानी प्रभाग अध्यक्ष विनायक भगत, मोहने टिटवाळा मंडळ युवा मोर्च्या अध्यक्ष राहुल पाटील , मंडळ उपाध्यक्ष भरत पाटील, प्रमोद घरत आदी मान्यवर उपस्थित होते,
       नेत्र चिकित्सा शिबिरात परिसरातील शंभर नागरिकांनी भाग घेतला, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहने टिटवाळा मंडळाच्या महिला अध्यक्ष निर्मला पवार , सरचिटणीस सुचिता होळकर, उपाध्यक्ष जसमीन पाटील यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम केल्याबद्दल आमदार नरेंद्र पवार यांनी कौतुक केले,




नगरसेविका उपेक्षा भोईर यांचे स्वागत करताना सरचिटणीस सुचिता होळकर,

  उद्घाटन प्रसंगी जेष्ठ नागरिक इंदूरकर मावशी यांचे स्वागत करताना आमदार नरेंद्र पवार महिला जिल्हा अध्यक्षा उज्वला दुसाने व प्रमुख पाहुणे,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरटीई अंतर्गत सण 2018 चे एडमिशन थांबवावे लागतील - शाळांच्या संघटनेचा इशारा

नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक