महासभे कडून बडतर्फी रोखण्यासाठी सहा. आयुक्त अनिल लाड यांच्या गाठीभेटी सुरू

महासभे कडून बडतर्फी रोखण्यासाठी सहा. आयुक्त अनिल लाड यांच्या गाठीभेटी सुरू

कल्याण (  संतोष होळकर) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा करनिर्धारक अनिल लाड यांचे निलंबन करण्यात आले होते. दोन कंपन्यांच्या संचालक मंडळावर असल्याचे सिद्ध झाल्याने अनिल लाड यांना माजी आयुक्त ई रविंद्रन यांनी निलंबित केले होते. त्यांच्या निलंबना नंतरच्या चौकशी मध्ये लाड हे दोषी आढळल्या मुळे त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव लाच प्रकरणात पकडले गेलेल्या अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या बरोबरच  महासभेत ठेवण्यात आला आहे.  १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेत बडतर्फीचा निर्णय होऊ नये यासाठी निलंबित अनिल लाड आता नगरसेवक पदाधिकाऱ्याच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पटविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.

 या प्रकरणी अनेक नगरसेवक पदाधिकारी यांनी अनिल लाड यांना शब्द दिला असून तुमचे निलंबन होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्याने येत्या महासभेत अनिल लाड यांचे लाड पुरवणार  अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे.

मागे कार्यकारी अभियंता सुनील जोशी हे लाच प्रकरणात दोन वेळा पकडले गेले होते. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा प्रस्ताव महासभे समोर होता, तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात पैश्याचे वाटप केले गेल्याचे बोलले जात होते.सहाय्यक आयुक्त लाड यांनी नगरसेवक पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन अश्या प्रकारे पैश्याचे वाटप करू शकतात असे या प्रकरणी बोलले जात आहे.

सहाय्यक आयुक्त अनिल लाड यांचे बडतर्फीस महासभा अनुकूल राहील की अनिल लाड यांना वाचविण्यात येईल या बाबत येत्या १० ऑगस्टच्या महासभेतच चित्र स्पष्ट होणार असले तरी महापालिका वर्तुळात अनिल लाड यांच्या निलंबना वर शिक्कामोर्तब होणार नाही हे अगदी ठासून सांगत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत