कै. गजानन हिरु पाटील विद्यालयात दंत चिकित्सा शिबीर उत्साहात


कै. गजानन हिरु पाटील विद्यालयात

दंत चिकित्सा शिबीर उत्साहात


           कल्याण( प्रतिनिधी): - कल्याण जवळील अटाळी येथील कै. गजानन हिरु पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा झाला. यावेळी यावेळी विद्यालयातील विध्यार्थी व पालकांसाठी दंतचिकित्सा शिबीर ठेवण्यात आले होते, यावेळी समाजातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठीत नागरिक, पालकवर्ग, संस्था सभासद, शिक्षकवृंद आणि विद्यार्थीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ तोगेरे यांनी झेंडावंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी शाळेतील अनेक विद्याथ्र्यांनी भाषणे तसेच देशभक्तीपर गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील सरांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, गजानन पाटील शाळेचा सध्याचा अभ्यासाचा स्तर पाहता ही शाळा ठाणे जिल्ह्यातील एक नंबर शाळा करण्याचा मानस आहे. तसेच या वर्षापासून इंग्रजी माध्यम सुरू होते असून पुढील वर्षी कॉलेजही काढण्याचा मानस आहे. 
यावेळी नवज्योती चॅरिटेबल डेंटल ट्रस्ट तर्फे डॉ. सौ. अभिलाषा धिरेंन्द्र सिन्हा यांनी मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अनेक विद्यार्थी, पालकवर्ग यांनी शिबिराचा आनंद लुटला.
   
          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक गणेश पाटील सर, मुख्याध्यापिका सौ. मीनल पाटील मॅडम तसेच शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षाली मॅडम यांनी  केले.

           यावेळी अध्यक्ष जगन्नाथ तोगेरे, संस्था अध्यक्ष नारायण शेठ पाटील, मारुती पाटील, दशरथ तरे, संभाजी भोईर, गोरख जाधव, वासुदेव पाटील, अंबादास पाटील, पांडुरंग पाटील, दशरथ पाटील, विलास रंधवे, हनुमान तरे, आर बी. आवारी, प्रकाश भोईर, चंद्रकांत भगत, के. पी. आहेर,  बी. टी. वाघ, विठ्ठल वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत