के एन टी स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल

के.एन.टी. स्कूलचा दहावीचा सातव्यांदा शंभर टक्के निकाल

टिटवाळाः- कल्याण डोंबिवली महानगर पालीका क्षेञातील टिटवाळा गंणपती परीसरात असणारी के.एन.टी. पब्लिक स्कूलचा सातव्यांदा शालांत परिक्षचा निकाल शंभर टक्के लागल्याने पालक वर्गातून या स्कूलच्या शिक्षक वर्गाचे अभिनंदन करण्यात येत आहेत.
          टिटवाळा शहरात अनेक नामावंत शाळा आहेत. परंतु आज पर्यंत या शाळांचा निकाळ शंभर टक्या पर्यंत गेला नाही. येथील टिटवाळा मंदिरा जवळ आसणारी के.एन.टी. पब्लिक स्कूल ने माञ आज पर्यंत सळग सातव्यांदा शालांत(दहावी) परिक्षत शंभर टक्के निकाल लावण्याची आपली परंपरा यंदा देखील कायम ठेवली. यंदा या शाळेतून २० मुल दहावीच्या परिक्षेला बसली होती. ती सर्वच्या सर्व मुलं पास झाली आहेत. वृषभ तिवारी ९०%, वामशी मेदुरी ८९%, व मेघना दास ८४% या मुलांनी शालांत परिक्षेत यश संपादन केले. शाळेचा निकाळ शंभर टक्के लागल्याने पालक वर्गातून व नागरीकातून शाळेते व शाळेच्या शिक्षकांचे कौतूक करण्यात येत आहेत. या शाळेचा सातव्यांदा शंभर टक्के निकाल लागण्यामागे शाळेच्या मुख्यध्यापिका रूचिता जुवेकर व सुपरवाझर यास्मीन मँडम यांची विशेष मेहनत असल्याचे  संस्थापक सतिश तिवारी यांनी सांगीतले. या शाळेचा आदर्श येथील इतर शाळांनी देखील घ्यावा असे मत सामाजिक कार्यकर्ता मनोज कार्वे यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत