कल्याण डोम्बिवली मनापाची नियोजन शुन्यता

कल्याण डोंबिवली मनापाची नियोजन शुन्यता
रस्त्ये व पाण्याच्या लाईनीच्या कामात तालतंञ नाही
उमेश जाधव
टिटवाळाः- कल्याण डोंबिवली महानगर पालीकेच्या
प्रत्येक प्रभागात सध्या रंत्यांच्या डांबरीकरणाचे व
कॉंक्रेटी करणाचे काम प्रगती पथावर सुरू आहे.
परंतू ही कामे करत असतांना रस्त्याच्या मधोमधो
पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचा अडथाला
निर्माण होत आहे. ज्यावेळी या लाईन टाकल्या
गेल्या त्यावेळी संबधी विभागाने याचा अभ्याकरून
लाईन टाकायला हव्या होत्या अशा प्रकारचा सुर
येथून निघत आहे.
         कडोमनापा क्षेञा करोडो रूपयाचा निधी
खर्चून रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. यात
डांबरीकरण व कॉंक्रेटीकरणाच्या कामांचा समावेश
आहे. पालीकेच्या 'अ' प्रभाग झेञातील प्रभाग
क्रमांक ५ व ६ मांडा टिटवाळा येथे देखील मोठ्या
प्रमाणात नविन रस्ते निर्मितीची कामे सुरू आहेत.
संपूर्ण उन्हाळा निघून गेला पावसाळा ेआला
तरी ही कामे पूर्ण होत नाहीत. यामुळे जागो
जागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांचा नागरीकांना
नहाक ञास सहन करावा लागत आहे. या सर्व
बाबीला पालीका प्रशासनच जबाबदार असल्याचा
सुर येथील जाणकार मंडळीतून निघत आहे.
याचे कारण म्हणजे २०१० ला पालीका 
याठिकाणी नविन पिण्याच्या पाण्याच्या पाईप
लाईन टाकण्याचे काम केले. परंतू त्यावेळी
त्यांनी रस्त्याची मार्किंग न घेताच डिपी रस्ता
किती रूंदीचा आहे हे बाजूला ठेऊन अगदी रस्त्याच्या
मधोमध पाईप लाईन टाकण्याचे काम केले.
या कारणास्तव सध्या रस्त्याच्या नुतनिकरण्याच्या
कामात या पाईप लाईनींचा मोठ्या प्रमाणात
आढथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्ता
निर्मीतीचे काम संथगतीने सुरू आहे. कारण
खोदकाम करतांना या पाईप लाईन टूटून लाखो
लिटर पाण्याचा देखील अपव्य होत आहे. तसेच
रस्ता खोदून ठेऊन कित्येक दिवस होऊन
देखील पाणी पुरवठा विभागाकडून या बाबीकडे
लक्ष केंद्रीत केले जात नाही. रस्ता तसाच
खोदून ठेवल्यामुळे याचा ञास येथील जनतेला
भोगावा लागत आहे. दोन्ही विभागांची एक
मेकांत नसल्याने हा प्रकार घडत आहे. त्यामुळे सध्या मातादी मंदीर ते रेल्वे फाटक या रस्त्याच्या कामात येणार्या पाईप लाईन रस्त्याच्या कडेला न हालवता आगदी रस्त्याच्या मघोमध टाकून रस्स्याचे काम पुर्ण करण्यात येत आहे. उद्या एखाद्या ठिकाणी पाईप लाईन लिकेज झाल्यास पुन्हा हा रस्ता खोदावा लागेल.
त्यामुळे पुन्हा रस्ता नादुरूस्त होणार. यावरून
पालीका प्रशासनाची नियोजन शुन्याता या कारणास्तव
दिसून येत आहे. हा जनतेच्या पैशाचा अक्षाशा
प्रशासनाकडून अपव्यय होत आसल्याचा सुर
येथील जाणकार नागरिकातून निघत आहे.
      या संदर्भात मी दोन्ही विभागाच्या अधिकारी
वर्गास लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत.
बुधाराम सरनोबत, नगरसेवक प्र.क्र.५
       संपूर्ण कल्याण डोंबिवली मनपाच्या पाईप
लाईन रस्त्यांच्या खालूनच टाकण्याक आल्यात
मातादी मंदिर ते रेल्वे फाटक हा रस्ता तर डांबरी आहे.
त्यात काही होक नाही. प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत