असलेला सिमेंट रस्ता तोडला

               पालिकेचा प्रताप असलेला सिमेंट रस्ता तोडला

             



             कल्याण( संतोष होळकर ):- कल्याण पूर्व मधील नेतीवली चौक ते चक्की नाका या  सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी मोठया प्रमाणावर घोळ सुरू आहे, 


             गेल्या 10 वर्ष्या पासून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत सिमेंट रस्त्यांची कामे कासवाच्या गतीने सुरू आहेत, पालिकेतील एकही सिमेंट रास्ता आज पर्यंत पूर्ण झालेला नाही, या मुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून झालेल्या रस्त्यांवर मोठया प्रमाणावर भ्रष्ट्राचार मुळे भेगा पडल्या आहेत, या भेगा बुजविण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे,

            कल्याण पूर्व मधील नेतीवली ते चक्की नाका या रस्त्याचे काम सुरू असून महापालिकेच्या नेतीवली दवाखाना जवळ सिमेंट चा सुमारे 50 मीटर रस्ता मशनरी लावून तोडण्यात आला आहे, याबाबत आमच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचा नकाशा चुकीचा बनविल्याने तो फारच उंच झाला होता त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना त्याचा त्रास होत असल्याने आम्ही आयुक्तांच्या मंजुरीने कामात दुरुस्ती करीत आहोत काम केल्याने व दुरुस्ती करण्यासाठी येणारा खर्च आम्ही ठेकेदाराला देणार नसल्याची प्रतिक्रिया प्रकल्प विभागाचे उपअभियंता संदीप तांबे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

              माहापालिकेने डिझाईन करून व स्थळ पाहणी मध्ये दाखविल्या प्रमाणे पालिका ठेकेदार काम करत असतात याचा भुर्दंड ठेकेदारास का असा सवाल ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी विचारत आहेत,

               महापालिका मनमानी कारभार करीत असून कश्याह प्रकारे जनतेच्या पैश्याची उधळ पट्टी सुरू असून ठेकेदाराने नियमानुसार केलेले काम तोडून पुन्हा नवीन बनविणे ही पैश्याची उधळ पट्टी करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करण्याचा अधिकार कोणासही नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष गायकवाड यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत