पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रभाग अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर 25 हजारांची लाच घेताना अटक

प्रभाग अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर 25 हजारांची उंबरठ्यावर 25 घेताना अटक   लाच खोर सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांना कारवाई कल्याण (प्रतिनिधी ) : कल्याण डोंबवली महानगर पालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरत्या वर्षी पुन्हा एकदा पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला असून, आय प्रभाग अधिकारी शरद पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला, अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पहिला हप्ता 25 हजरांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक केली आहे, पालिकेच्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत एकूण 34 अधिकारी कर्मचार्यांसह नगरसेवक ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागलें आहेत . सापळ्यात अडकलेले शरद पाटील हे  तीन महिन्यांनी मार्च महिन्यात सेवा निवृत्त होणार होते, त्यांनी या प्रकरणामुळे आपल्या सर्व कामाईची वाट लावली अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे,       कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला भ्रष्टाचाराणे पोखरले असल्याने लाचखोरीला उधाण आले आहे .पालिकेत गेल्या अनेक वर्षात दोन डझनाहून अधिक अधिकारी व कर्मचार्यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक...

किल्ले स्पर्धा प्रत्येक शाळेने भरवाव्यात: आमदार पवार

इमेज
किल्ले स्पर्धा प्रत्येक शाळेने भरवाव्यात: आमदार पवार कल्याण( प्रतिनिधी ):- किल्ले स्पर्धा शाळेत घेणे हा चांगला उपक्रम असून प्रत्येक शाळेत अश्या स्पर्धा झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमाची माहिती मिळेल अश्या स्पर्धा फक्त मराठी शाळेतूनच होऊ शकतात, किल्ले स्पर्धा आयोजित केल्याने मुलाना किल्ल्यांची माहिती होते व आपला इतिहास विद्यार्थ्यांना समजतो, इंग्लिश मिडियमच्या शाळेतून शिवाजी महाराजांच्या इतिहास गायब झाले असून महाराष्ट्रात असे होणे योग्य नसल्याचे मत आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले, अटाळी येथील गजानन हिरू पाटील विद्यालयातील 1 पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 74 विविध किल्ले बनविले होते त्याचा प्रदर्शनाच्या उदघाटन समई आमदार नरेंद्र पवार बोलत होते, या वेळी आमदार पवार यांनी आपण स्वतः सुमारे 30 किल्ले पाहून झाले असून सर्व विद्यार्थ्यांनी महाराजांच्या 1 तरी किल्यावर एकदातरी जाऊन या असे आवाहन करून विध्यार्थ्यांनी  चांगल्या प्रकारे किल्ले बनविले बद्दल त्यांचे कौतुक केले, या वेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील, जनार्धन पाटील,...

महिलांनी फक्त प्रशिक्षण न घेता आर्थिक सक्षम व्हावे:- आमदार नरेंद्र पवार

इमेज
महिलांनी फक्त प्रशिक्षण न घेता आर्थिक सक्षम व्हावे:- आमदार नरेंद्र पवार कल्याण( प्रतिनिधी ):- महिलांनी फक्त प्रशिक्षनासाठी उपस्थित न राहता या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या माहितीचा योग्य तो उपयोग करून आपला रोजगार व रोजीरोटी कमविण्यासाठी त्याचा उपयोग करावा त्या साठी लागणारी सर्व प्रकारची मदत भारतीय जनता पक्षतुन आम्ही नेहमीच करत राहू मात्र महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार नरेंद्र पवार यांनी केले, भाजप महिला आघाडी व भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड मार्फत अटाळी येथील गजानन हिरू पाटील विद्यालयात झालेल्या दोन दिवसीय महिला सक्षमीकरण शिबिराचे उदघाटन प्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले, यावेळी उपमहापौर उपेक्षा भोईर, मोहने मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील सर, माजी परिवहन सभापती रमेश कोणकर, मुख्याध्यापिका मीनल पाटील मॅडम, आगरी कवी ग्राहक अधिकारी गजानन पाटील, प्रादेशिक संचालक अभिजित चावक, कामगार शिक्षक चंद्रकांत खोत, नागेश पाटील, निर्मला पवार, सुचिता होळकर आदी मान्यवर उपस्थित होते, दोन दिवसीय महिला सक्षमीकरण शिबिरातील...

वन जमिनीवरील शेकडो बांधकामे जमीनदोस्त

इमेज
वन जमिनीवरील शेकडो बांधकामे जमीनदोस्त लाठीचार्ज करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी           कल्याण(प्रतिनिधी) :- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील उंभार्ली गावलीतील वनजमिनिवरील अतिक्रमण केलेल्या शेकडो खोल्यांचे अनधिकृत बांधकामे आज वन विभागाने दहशत माजवत जमीन दोस्त केले, वन विभागाची ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते,             महाराष्ट् सर्वच ठिकाणी वनजमिनिवर मोठया प्रमाणावर भूमाफियांनी  अतिक्रमण केले असून वनविभागाची आजची कार्यवाही म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार असल्याचे दिसून आले, लाखो रुपये कमविणार्या भूमाफियांवर ही कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे, असे केल्यावरच अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होणार नाहीत,           कल्याण जवळील उंभार्ली गावात काही भूमाफियांनी गेल्या 5 ते 6 वर्षा पासून वनजमिनिवर अतिक्रमण करत सुमारे 300 खोल्या बनविल्या आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून बनत असलेले अनधिकृत बांधकामे पालिका, पोलीस, वन विभाग लोक...

20 लाख खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतातील पहिल्या स्पर्धा - देवेंद्र फडणवीस

इमेज
20 लाख खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतातील पहिल्या स्पर्धा - देवेंद्र फडणवीस            कल्याण(प्रतिनिधी ):- महाराष्ट्र भर 20 क्रीडा व 5 सांस्कृतिक प्रकारच्या सीएम चषक सुरू असून या मध्ये 20 लाख खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या सीएम चषक स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून या स्पर्धांच्या खेळाडूंची नोंदणी 50 लाखावर जाईल असा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.             मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याण जवळील मोहने येथे एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फूटबॉल अंतिम सामन्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी त्यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.प्रारंभी आयोजक आमदार नरेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व मराठवाड्यात सहा ठिकाणी आपण जलयुक्त शिवारची कामे सुरू केल्याची माहिती दिली.             हारजीत महत्वाची नाही, संघभावनेतून केलेला खेळ महत्वाचा आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले ...