20 लाख खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतातील पहिल्या स्पर्धा - देवेंद्र फडणवीस
20 लाख खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतातील पहिल्या स्पर्धा - देवेंद्र फडणवीस
कल्याण(प्रतिनिधी ):- महाराष्ट्र भर 20 क्रीडा व 5 सांस्कृतिक प्रकारच्या सीएम चषक सुरू असून या मध्ये 20 लाख खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या सीएम चषक स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून या स्पर्धांच्या खेळाडूंची नोंदणी 50 लाखावर जाईल असा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याण जवळील मोहने येथे एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फूटबॉल अंतिम सामन्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी त्यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.प्रारंभी आयोजक आमदार नरेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व मराठवाड्यात सहा ठिकाणी आपण जलयुक्त शिवारची कामे सुरू केल्याची माहिती दिली.
हारजीत महत्वाची नाही, संघभावनेतून केलेला खेळ महत्वाचा आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, खेळामुळे जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते, सांघिक भावना वाढीला लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मंदिरा पेक्षा युवकांनी फूटबॉल मैदानावर जावे.
एनआरसी कामगारांच्या पाठीशी
कल्याण भागातील एनआरसी सारखी मोठी कंपनी अडचणीत आली आहे, कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यावर निश्चितपणे तोडगा काढून कामगारांचे संसार वाचविण्यात येईल तसेच रिंग रूट मध्ये ज्यांची घरे जात आहेत त्यांच्याबाबतीत देखील सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी आयोजकांच्या वतीने मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,तुळशीचे रोप देऊन मुख्यमंत्र्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार कपिल पाटील,आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड,उपमहापौर श्रीमती उपेक्षा भोईर,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा