किल्ले स्पर्धा प्रत्येक शाळेने भरवाव्यात: आमदार पवार



किल्ले स्पर्धा प्रत्येक शाळेने भरवाव्यात: आमदार पवार


कल्याण( प्रतिनिधी ):- किल्ले स्पर्धा शाळेत घेणे हा चांगला उपक्रम असून प्रत्येक शाळेत अश्या स्पर्धा झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमाची माहिती मिळेल अश्या स्पर्धा फक्त मराठी शाळेतूनच होऊ शकतात, किल्ले स्पर्धा आयोजित केल्याने मुलाना किल्ल्यांची माहिती होते व आपला इतिहास विद्यार्थ्यांना समजतो, इंग्लिश मिडियमच्या शाळेतून शिवाजी महाराजांच्या इतिहास गायब झाले असून महाराष्ट्रात असे होणे योग्य नसल्याचे मत आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले,

अटाळी येथील गजानन हिरू पाटील विद्यालयातील 1 पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 74 विविध किल्ले बनविले होते त्याचा प्रदर्शनाच्या उदघाटन समई आमदार नरेंद्र पवार बोलत होते, या वेळी आमदार पवार यांनी आपण स्वतः सुमारे 30 किल्ले पाहून झाले असून सर्व विद्यार्थ्यांनी महाराजांच्या 1 तरी किल्यावर एकदातरी जाऊन या असे आवाहन करून विध्यार्थ्यांनी  चांगल्या प्रकारे किल्ले बनविले बद्दल त्यांचे कौतुक केले, या वेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील, जनार्धन पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक गणेश पाटील सर, प्रथमिकच्या मुख्याध्यापिका नीलम पाटील मॅडम, रमेश पाटील, मुकेश पाटील, संभाजी भोईर, एकनाथ वाघ, विलास रंधवे(मामा), आदी प्रमुख पाहुणे नागरिक व विध्यार्थी पालक उपस्थित होते,
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत