वन जमिनीवरील शेकडो बांधकामे जमीनदोस्त
वन जमिनीवरील शेकडो बांधकामे जमीनदोस्त
लाठीचार्ज करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
कल्याण(प्रतिनिधी):- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील उंभार्ली गावलीतील वनजमिनिवरील अतिक्रमण केलेल्या शेकडो खोल्यांचे अनधिकृत बांधकामे आज वन विभागाने दहशत माजवत जमीन दोस्त केले, वन विभागाची ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते,
महाराष्ट् सर्वच ठिकाणी वनजमिनिवर मोठया प्रमाणावर भूमाफियांनी अतिक्रमण केले असून वनविभागाची आजची कार्यवाही म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार असल्याचे दिसून आले, लाखो रुपये कमविणार्या भूमाफियांवर ही कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे, असे केल्यावरच अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होणार नाहीत,
कल्याण जवळील उंभार्ली गावात काही भूमाफियांनी गेल्या 5 ते 6 वर्षा पासून वनजमिनिवर अतिक्रमण करत सुमारे 300 खोल्या बनविल्या आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून बनत असलेले अनधिकृत बांधकामे पालिका, पोलीस, वन विभाग लोकप्रतिनिधी यांच्या डोळ्यादेखत सुरू असताना या पुर्वी कोणीही या अनधिकृत बांधकाम कामास विरोध केला नाही, या अनधिकृत बांधकामास या सर्व लोकांचा आर्थिक देवाण घेवाण मधून हितसंबंध असल्याची चर्चा ही कारवाई च्या परिसरात नागरिकांतून व्यक्त होत होते,
कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघेरे यांनी 26नोव्हेंबर रोजी सुमारे 300 नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या, नागरिकांनी अतिक्रमण हटविले नसल्याने आज ठाणे जिल्ह्यातील सर्वच वनविभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सह राज्य राखीव पोलिसांच्या मदतीने वनजमिनिवरील अतिक्रमणे हटविण्यात आले,
वनविभागाने अतिक्रमण हटविताना काही प्रमाणात लाठीचार्ज केल्यामुळे 13 वर्षीय एका मुलीला दुखापत झाल्याचे भाजप कार्यकर्ते मुन्ना रईस यांनी यावेळी सांगून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लाठीचार्ज करण्याच्या अधिकार कोणी दिला असा सवाल करून या अधिकाऱयांची तक्रार वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कढे करणार असल्याचे सांगितले,
स्थानिक नागरिक कोणत्याही प्रकारचा विरोध करीत नसतांना वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी एखाद्या गाव गुंडा सारखे नागरिकांवर धावून जात होते तसेच नागरिकांना फोटो काढण्यास विरोध करतांना त्यांचे मोबाईल काढून घेत होते असे करण्याचा अधिकार व हुकूमशाही वनविभागाला कोणी दिली व यांना इतका माज कसा आला असा सवाल बल्यानी प्रभागाचे भाजप अध्यक्ष विनायक भगत यांनी या प्रसंगी केला,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा