प्रभाग अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर 25 हजारांची लाच घेताना अटक
प्रभाग अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर 25 हजारांची उंबरठ्यावर 25 घेताना अटक
लाच खोर सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांना कारवाई
कल्याण (प्रतिनिधी ) : कल्याण डोंबवली महानगर पालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरत्या वर्षी पुन्हा एकदा पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला असून, आय प्रभाग अधिकारी शरद पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला, अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पहिला हप्ता 25 हजरांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक केली आहे, पालिकेच्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत एकूण 34 अधिकारी कर्मचार्यांसह नगरसेवक ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागलें आहेत . सापळ्यात अडकलेले शरद पाटील हे तीन महिन्यांनी मार्च महिन्यात सेवा निवृत्त होणार होते, त्यांनी या प्रकरणामुळे आपल्या सर्व कामाईची वाट लावली अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे,
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला भ्रष्टाचाराणे पोखरले असल्याने लाचखोरीला उधाण आले आहे .पालिकेत गेल्या अनेक वर्षात दोन डझनाहून अधिक अधिकारी व कर्मचार्यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटका करूनही लाचखोरीची चटक अद्यापही अधिकारी व कर्मचार्या मधील खुमखुमी कमी झालेली नाही काही दिवसांपूर्वी ,पालिकेतील घनकचरा विभागात वारसा हक्काने नोकरीमध्ये कायम करण्याकरिता मूल्यमापन अहवालावर शेरा लिहण्यासाठीआरोग्य निरीक्षक मोहन दिघे याने दहा हजाराची लाच मागितली होती या प्रकरणी मंगळवारी सकाळी अँन्टी करप्शन ब्युरो विभागाने साफळा रचून आरोग्य निरीक्षक मोहन दिघेला पाच हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केलयाची घटना घडली होती तोच पुन्हा एकदा आय प्रभाग अधिकरी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला .सदर तक्रार दार यांचे माणेरे-चिंचपाडा येथे बांधकाम केलेल्या चाळी अनधिकृत असुन त्यावर कारवाई न करण्यासाठी प्रभाग अधिकारी शरद पाटील यांनी
80हजार रुपये लाचेची मागणी केली होती .तडजोडी अंती पहिला हप्ता 25 हजारांचा ठरला याबाबत तक्रार दाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबधक विभगाकडे तक्रार केली होती या तक्रारीची शहानिश करत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत त्याला 25 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली,
लाच खोर सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांना कारवाई
अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना लाच लुचपत विरोधी पथकाने लाच घेताना अटक केली, ते प्रकरणही याच आय प्रभागातील असल्याने शरद पाटील यांच्या अटकेला महत्त्व प्राप्त झाले असून पालिकेतील अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचे प्रमुख सुनील जोशी हे लाच प्रकरणी अटक झालेले व आत्ता जामिनावर असून अनधिकृत बांधकाम पथकाचे प्रमुख असल्यानेही या प्रकरणात सुनील जोशी यांची चॉकशी होणे गरजेचे झाले आहे,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा