महिलांनी फक्त प्रशिक्षण न घेता आर्थिक सक्षम व्हावे:- आमदार नरेंद्र पवार

महिलांनी फक्त प्रशिक्षण न घेता आर्थिक सक्षम व्हावे:- आमदार नरेंद्र पवार


कल्याण( प्रतिनिधी ):- महिलांनी फक्त प्रशिक्षनासाठी उपस्थित न राहता या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या माहितीचा योग्य तो उपयोग करून आपला रोजगार व रोजीरोटी कमविण्यासाठी त्याचा उपयोग करावा त्या साठी लागणारी सर्व प्रकारची मदत भारतीय जनता पक्षतुन आम्ही नेहमीच करत राहू मात्र महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार नरेंद्र पवार यांनी केले,

भाजप महिला आघाडी व भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड मार्फत अटाळी येथील गजानन हिरू पाटील विद्यालयात झालेल्या दोन दिवसीय महिला सक्षमीकरण शिबिराचे उदघाटन प्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले, यावेळी उपमहापौर उपेक्षा भोईर, मोहने मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील सर, माजी परिवहन सभापती रमेश कोणकर, मुख्याध्यापिका मीनल पाटील मॅडम, आगरी कवी ग्राहक अधिकारी गजानन पाटील, प्रादेशिक संचालक अभिजित चावक, कामगार शिक्षक चंद्रकांत खोत, नागेश पाटील, निर्मला पवार, सुचिता होळकर आदी मान्यवर उपस्थित होते,


दोन दिवसीय महिला सक्षमीकरण शिबिरातील महिलांना मार्गदर्शन करताना उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सांगितले की महिलांनी बचतगट काढून गप्प बसण्या पेक्षा मार्गदर्शन कार्यक्रमातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून उद्योग धंदा सुरू करावा त्या साठी महापालिकेतून अनेक योजना राबविल्या जातात त्याचा फायदा घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले व सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले,

दोन दिवसीय शिबिरात प्रादेशिक संचालक अभिजित चावक,  ग्राहक अधिकारी गजानन पाटील, कामगार शिक्षक चंद्रकांत खोत, रमेश कोणकर, संतोष होळकर यांनी महिलांना मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व स्वावलंबी होण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले, या वेळी अटाळी परिसरातील 40 महिलांनी दोन दिवस सहभाग घेतला होता, सहभागी महिलांना त्यांच्या बँक खात्यात भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड यांच्या कडून 400 रुपयांचे मानधन जमा होणार आहे,

अटाळी येथील गजानन हिरू पाटिल विद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात 40 महिलांबरोबरच परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली होती, हा कार्यक्रम लोकहिताचा असल्याने 4 ते 5 ठिकाणी अजून लावावेत असे आयोजक व प्रादेशिक संचालक यांना विनंती करण्यात आली, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा महिला मंडळ सरचिटणीस सुचिता होळकर, अध्यक्ष निर्मला पवार, उपाध्यक्ष जाशमीन पाटील, ज्योती जाधव, रोहिणी बाठे आदींनी मेहनत घेतली,

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत