माजी नगरसेवकाची विकासकाला धमकी विकासकाची पोलिसांत तक्रार

 


कल्याण : विकासकाच्या इमारतीत विकत घेतलेल्या बांधकामाचे पैसे विकासकाने मागितल्याने डोंबिवलीतील मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर यांनी विकासक संजयकुमार मकनजी ठक्कर यांना शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप संजयकुमार ठक्कर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस उपायुक्तांना पत्र देऊन संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

            संजयकुमार ठक्कर हे सर्वे न. १४५, ही. न.३ व प्लॉट न. ५ या भूखंडावरती अधिकृत इमारतीचे बांधकाम करीत आहे. या इमारतीमध्ये मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर यांनी ठक्कर यांच्याकडून २८०० चौ फू बांधकाम अल्प दराने विकत घेतले होते. त्याची किम्मत १ कोटी १४ लाख देण्याचे ठरले होते. ठक्कर यांना आतापर्यंत १० लाख रुपयेच देण्यात आले. सध्य स्थतीत इमारतीचे बांधकाम ९०% पेक्षा अधिक झालेले आहे.  त्यामुळे प्रकाश भोईर यांच्या कड़ून जेवढे बांधकाम झालेले आहे तेवढ्या पैशाची मागणी केले असता त्यांनी ठक्कर यांना शिवीगाळ करून तुला एकही रुपया देणार नाही तुला काय करायचे आहे ते कर असे बोलून तू या इमारतीच्या साईटवर आल्याबर तुझे हातपाय तोडतो व तुला संपवून टाकतो अशाप्रकारे धमकी दिली असल्याचा आरोप ठक्कर यांनी केला आहे.


 त्यामुळे ठक्कर यांनी प्रकाश भोईर  यांना फ्लॅट न देण्याचे नक्की केले असून याबाबत त्यांनी विष्णुगर पोलिस ठाणे येथे अदाखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश भोईरयांनी दिलेल्या या धमकी मुळे ठक्कर कुटुंबीय घाबरून गेले असून त्यांच्या जीविताचे काही बरेवाईट किंवा इजा झाल्यास यासाठी प्रकाश भोईर जवाबदार असतील.  तरी त्यांच्यार योग्य ती कारवाई करावी अशी मागणी संजयकुमार ठक्कर यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत