समन्वय प्रतिष्ठान चा उपक्रम

 सामाजिक बांधिलकी जपत  विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, समन्वय प्रतिष्ठानचा उपक्रम


कल्याण (प्रतिनिधी):- उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. तसेच शिक्षणापासून एकही मुल वंचित राहु नये आणि सामाजिक गरीबीमुळे विद्यार्थ्यांचे प्रगतीला बाधा येऊ नये म्हणून शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक बांधिलकीने दरवराबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन कल्याण येथील समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड. जनार्दन टावरे यांनी केले.



दि. २६ जून २०२२ रोजी मुरबाड तालूक्यातील करपट वाडी, टोकावडे येथिल जिल्हा परीषद शाळेत समन्वय प्रतिष्ठान तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड. टावरे यांनी पुढे सांगितले की, शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना निर्माण झाली पाहिजे म्हणून आनंददायक शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्याचप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्तीची वाढ होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश देऊन पर्यावणाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी सामाजिक बांधिलकीने सांगितले की, प्लॅस्टिक पिशवी व वस्तूंचे दैनंदिन वापर वाढल्याने पर्यावरणात झालेले बदल व प्रदुषणामुळे पर्यावरणाची कशी हानी होत आहे व त्यावर उपाय योजना याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी शाळेतील एकुण २३ विद्यार्थ्यांना स्कूल बंग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.


याप्रसंगी मुबई येथिल ताज हॉटेलचे इलेक्ट्रीकल इंजिनिअर मनोज गिरी, शाळेतील फापाळे सर, शिक्षण ग्राम समितीचे उपाध्यक्ष पारधी, सरपंच पारधी साहेब, ग्रामस्थ तसेच समन्वय प्रतिष्ठानचे ऍड. अतूल शेळके, सुजित शेरे, गौरव गायकवाड, सुरज देसाई, संदेश ज्ञायणित, श्रीराम चौधरी, प्रमोद ठूळ, अमोल जाधव, केदार शेरे, नितिन सावंत, संतोष खेताडे, मंगेश टेंबे, शंकर पाटील, प्रविण मालूसरे, मंगेश टेंबे, गुरुनाथ भोईर, सुहास मोहळ, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऍड सुनिल उबाळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत