कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या विरोधात कल्याण येथील पत्रकारांनी निषेध आंदोलन केले. संध्याकाळी आंदोलन कर्त्या सुमारे ४० पत्रकारांना आयुक्त सोनवणे यांनी चर्चा करण्या साठी बोलाऊन चर्चा केली.
डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा झाली. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा