विद्यार्थी भारतीचे आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण...
विद्यार्थी भारतीचे आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण...
नितीन आगे ला न्याय मिळावा यासाठी करणार उपोषण...
२०१४ साली अहमदनगर जिल्ह्यात खर्डा या गावी नितीन आगे ची अमानुष पाने हत्या करण्यात आली. ११ वी ला असणाऱ्या या तरुणाची एका उच्चजातीय मुलीशी जवळची मैत्री होती आणि यामुळे त्याच गावातील उच्चजातीय लोकांनी नितीन ला शाळेतून अनोळख्या ठिकाणी खेचत नेऊन त्याला मारहाण केली व त्याला जीवानिशी मारून टाकले आणि गावात झाडावर लटकवले. हे प्रकरण घडल्यानंतर अनेक पुरावे असताना देखील साक्षीदार फितूर झाले असे सांगून जिल्हा सत्र न्यायालयाने नितीन आगे ला न्याय दिलेला नाही असा आरोप विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा विजेता भोनकर यांनी केला आहे.
नितीन आगे ला ज्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे तसा न्याय दिलेला नाही. कारण घरातील लोक साक्षीदार असताना तसेच मेडिकल रिपोर्ट असताना देखील जिल्हा सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी आरोपीना सोडून दिले आणि आज ते आरोपी मोकाट आणि जातीचा माज घेऊन गावात फिरत आहेत अशी माहिती विद्यार्थी भारती कार्याध्यक्षा स्मिता साळुंखे यांनी दिली आहे.
२०१४ देखील जेव्हा हे हत्याकांड झाले तेव्हा पण विद्यार्थी भारतीने आवाज उठवला होता आणि आजही विद्यार्थी भारती या लढाईला लढत आहे. नितीन आगे ला न्याय मिळावा यासाठी दि. ६ डिसेंबर रोजी दादर येथे सही मोहीम घेण्यात आली आणि त्यात हजारो सह्या या नितीन आगे साठी जमा करण्यात आल्या असल्याचे विद्यार्थी भारती संघटक स्वप्निल तरे यांनी म्हटले आहे.
नितीन आगे ला न्याय मिळावा, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी तसेच हा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालवण्यात यावा यासाठी विद्यार्थी भारती संघटनेतर्फे दि.११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत लाक्षणिक उपोषण घेणार आहोत. यामध्ये अनेक विद्यार्थी उपोषणाला बसणार असून एखाद्या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यार्थी भारती कोकण अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी म्हटले आहे.
नितीन आगे च्या लढाईला मिळालेल्या हजारो सह्या तसेच उपोषणाच्या अनेक मागण्या घेऊन विद्यार्थी भारती आझाद मैदानातील उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचे विद्यापीठ अध्यक्षा ज्योती निकाळजे यांनी म्हटले असल्याचे मुंबई अध्यक्ष मंथन घरत यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा