डोंबिवलीत भाजपाचा जल्लोष
डोंबिवलीत भाजपाचा जल्लोष
गुजरातमध्ये पुन्हा २२ वर्षानंतरही सत्ता का यम टिकवण्यात भाजपा यशस्वी झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद व्यक्त करीत भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशाच्या तलावर नाचत-गाजत जल्लोष साजरा केला. भाजपाच्या या जल्लोषात डोंबिवलीकरही सामील झाले.
डोंबिवली पूर्वेकडील भाजपा पूर्व मंडल कार्यालयापासून जल्लोष मिरवणूकीस प्रारंभ झाला. हिमाचल आणि गुजरात या दोन्ही राज्यात भाजपाने बाजी मारल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष तथा नगरसेवक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते बेभाम झाले होते.
नगरसेवक विश्वजित पवार, संदीप पुराणिक, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, खोणी ग्रामपंचायतचे सरपंच हनुमान ठोंबरे, दिनेश दुबे, महिला आघाडी अध्यक्षा उज्वला दुसाने, चौधरी-पाटील, मंडल सरचिटणीस रविसिंग ठाकूर, बाळा पवार, पवन पाटील, प्रज्ञेश प्रभूदेसाई , प्रज्ञेश प्रभूदेसाई, वर्षा परमार , सुरेखा पांडे यांच्यासह इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते. भाजपा कार्यालय पासून निघालेली जल्लोष मिरवणूक रेल्वेस्थानक मार्गे बाजीप्रभू चौकातून भाजपा झिंदाबाद, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो” अशा गगनभेदी घोषणांनी आणि फटाक्यांच्या आवाजांनी परिसर दणाणून सोडला होता. पुढे इंदिरा चौकात पेढे वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आहे. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या ढोल-तासाच्या निनादात तल्लीनपणे नाचत होत्या
. यावेळी आपल्या जोषपूर्ण भाषणात शशिकांत कांबळे म्हणाले कि, भारतीय जनता पार्टीला आता पूर्वीसारखी पार्टी समजू नका आता आम्ही कधी काय करू आणि कशा प्रकारे लढू हे कुणालाही समजणार नाही. पण सर्व पक्षांनी समजून घ्यावं आम्ही कधीही विरोधासाठी विरोध केला नाही विकासाच राजकारण भाजपा करीत असते आणि गुजरात मध्येही तेच केलं त्याची परिणीती म्हणून एकदा गुजरातच्या मतदारांनी नरेंद्र मोदींना निवडून दिले आहे.डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेठे वाटप केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा