पोस्ट्स

फेरीवाला हटाव पथक हप्ता घेऊनही करतात कारवाई

  फेरीवाला हटाव पथक  हप्ता घेऊनही  करतात कारवाई     भाऊ पाटील यांचा आरोप डोंबिवली :- मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यावर पालिका प्रशासनाने  स्टेशन परिसरातील  फेरीवाल्यांना  हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र फेरीवाला संघटनेने यावर आपली भूमिका मांडण्यासाठी मंगळवारी डोंबिवलीत घेतलेल्या भव्य मेळाव्यात पालिकेच्या फेरीवाला हटाव पथक  हप्ता घेऊनही कारवाई केली जाते असा आरोप शिवगर्जना फळ-भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भाऊ पाटील यांनी केला.         कष्टकरी  हॉकर्स  व भाजी विक्रेता युनियनच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील शुभमंगल कार्यालयात फेरीवाल्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कष्टकरी  हॉकर्स  युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे , सल्लागार प्रशांत सरखोत , शिवगर्जना फळ-भाजी विक्रेता संघटनेने अध्यक्ष भाऊ पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाऊ पाटील म्हणाले , फेरीवाला हटाव पथकातील अधिकारी संजय कुमावत हे अनेक वर्ष याच पदावर का आहेत ? फेरीवाल्यांकडून पालिकेने जप्...

भोपर ते कोपर दिवे न लावल्यास `भीक मागो ` आंदोलन

इमेज
भोपर   ते कोपर दिवे न लावल्यास   `भीक मागो ` आंदोलन                 भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचा इशारा     डोंबिवली :-   भोपर गाव ते कोपर रेल्वे स्थानकापर्यत पथदिवे नसल्याने या रस्त्यावर  अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. म्हणून  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठान आणि येथील चाळकऱ्यानी  स्वखर्चाने  या रस्त्यावर एलएडीचे दिवे लावले होते. आता हे दिवे बंद पडले असल्याने आता  हि जबाबदारी पालिकेचे असल्याने या रस्त्यावर पथदिवे लावावीत अशी मागणी भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानने केली आहे. मात्र निधी अभावी हे काम रखडणार असेल तर आम्ही भीक मागो आंदोलन करू असा इशारा  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे  पदाधिकारी गजानन पाटील यांनी  दिला आहे.    भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि शिवसेना तालुकाप्रमुख  एकनाथ पाटील यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात विद्युत विभागाचे प्रमुख उपअभियंता राजेंद्र कुऱ्हेकर यांची भेट घेतली....

भोपर ते कोपर पथदिवे न लावल्यास `भीक मागो ` आंदोलन

भोपर  ते कोपर पथदिवे न लावल्यास   `भीक मागो ` आंदोलन         डोंबिवली :-  भोपर गाव ते कोपर रेल्वे स्थानकापर्यत पथदिवे नसल्याने या रस्त्यावर  अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. म्हणून  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठान आणि येथील चाळकऱ्यानी   स्वखर्चाने  या रस्त्यावर एलएडीचे दिवे लावले होते. आता हे दिवे बंद पडले असल्याने आता  हि जबाबदारी पालिकेची असल्याने या रस्त्यावर पथदिवे लावावीत अशी मागणी भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानने केली आहे. मात्र निधी अभावी हे काम रखडणार असेल तर आम्ही भीक मागो आंदोलन करू असा इशारा  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे  पदाधिकारी गजानन पाटील यांनी  दिला आहे.

बसचा वापर फुगे विकण्यासाठी

इमेज
फेरीवाल्याचा बंद पडलेल्या बसला फुगे लावून व्यवसाय.  कल्याण :कल्याण डोंबिवली परिवाहनच्या मुख्य डेपोच्या बाहेर बंद पडलेल्या केडीएमटी बसचा आसरा घेत फेरीवाल्यांने व्यवसाय सुरू करत जणू काही 'फुग्यासह केडीएमटी बस विकणे आहे' असे केडीएमटी प्रशासनाची खिल्ली उडवली आहे. यामुळे केडीएमटी प्रशासनाचा ढिसाळ कारभार चर्चेचा विषय ठरला आहे.     पालिका परिवहन विभागाच्या ताफ्यात 218 बसेस आहेत पैकी 81 बसेस रस्त्यावर धावत असून त्यातील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे केडीएमटी डबघाईला येत असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे खासगी ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्याने कल्याण पश्चिम परिसरात खराब झालेल्या बसेस गणेश घाट डेपोच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असल्याने केडीएमटीला घरघर आल्याचे समोर आले आहे. कल्याण पश्चिममधील केडीएमटी गणेश घाट बाहेर बंद पडलेल्या बसेस उभ्या आहेत. त्याचा आसरा घेऊन फुगे विकत आहे. त्याने चक्क बंद पडलेल्या बसेसला फुगे लावले असून जणू काही केडीएमटी बस विक्री करणे आहे. असे चित्र समोर आल्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन होत असून केडीएमटी प्रशासन बसेस ची सुर...

मोहने येथे बगीचा आणि अवकाश केंद्राची मागणी

इमेज
मोहने येथे बगीचा आणि अवकाश केंद्राची मागणी           कल्याण : कल्याण जवळ असलेल्या मोहने येथील  पंप हाऊस च्या जागेवर बगीचा व अवकाश केंद्र उभारावे अशी मागणी अ प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. यासाठी नगरसेवक निधी देण्याची तयारी दाखवून उर्वरित निधी पालिका प्रशासनाने तरतूद करत नागरिकासाठी मनोरंजण व शैक्षणिक केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचे निवेदन पत्र कोट यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.         महापालिकेचे मोहने पंप हाऊस बंद होण्याच्या मार्गावर असल्याने या ठिकाणी मोकळ्या होणाऱ्या जागेवर नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी,खगोलप्रेमींसाठी, पक्षी निरीक्षक प्रेमींसाठी अद्यावत बगीचा व अवकाश दर्शन दुर्बीण,महापालिका प्रोजेक्ट मॉडेलचे दर्शन, उल्हासनदी किनारी उतरण्यासाठी घाट आदी सुविधा करत शैक्षणिक व मनोरंजन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव  मनसेच्या अ प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट यांनी प्रशासनाला सादर केला आहे. तसेच या कामासाठी नगरसेवक निधीतून पाच लाख रुपये देण्याची तयारी...

डोंबिवली स्टेशन जवळून केडीएमटी बससेवा सुरु

इमेज
                     डोंबिवली स्टेशन जवळून केडीएमटी बससेवा सुरु कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकपरिसरमधून केडीएमटी बस सोडून केडीएमटी परिवहन समिती सदश्यांनी अनोखी भेट दिली.  मंगळवार सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला, यावेळी परिवहन विभागाला चांगले दिवस यावे यासाठी सभापती संजय पावशे यांनी साकडे घातले यावेळी उपस्थितांनी होय महाराजा म्हणत साथ दिली. डोंबिवली पूर्व  रेल्वे स्थानक परिसर मधून केडीएमटी बसेस सोडाव्या अशी मागणी होती त्याला अखेर आज मुहूर्त मिळाला. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते लोढा हेवन व्हाया निळजे रेल्वे स्थानक, दुपार सत्र डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते मानपाड़ा, पी एंड टी कॉलनी,  ग्रोगासवाडी या बसेस पूर्वी बाजी प्रभु चौकातुन सूटत असत.  सभापती संजय पावशे, स्थानिक नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेता मंदार हळबे, महाव्यस्थापक देवीदास टेकाळे, वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोंविद गंभीरे, प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, अमित पंडित, परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण, राजेंद्र दी...
इमेज
उभार्णी ते श्री क्षेत्र टिटवाळा महागणपती पायी दिंडीचे टिटवाळ्यात स्वागत कल्याण : श्रावणी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून पंचक्रोशितील बल्याणी, उंभार्णी ग्रामस्थाच्या वतीने   सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र टिटवाळा महागणपती पायी दिंडी सोहळा संपन्न झाला. टिटवाळ्या मध्ये या पायी दिंडीचे स्वागत स्थायी समिती सदस्य नगरसेविका उपेक्षा शक्तीवान भोईर यांनी केले. याप्रसंगी दिंडीतील वारकरी  व भाविकांना खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले. समाजसेवक शक्तीवान भोईर आणि स्थायी समिती सदस्य उपेक्षा भोईर यांनी पायी चालत या दिंडीत सहभाग घेतला. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोईर, यामिनी चव्हाण, कल्पना रोंबेकर, राजश्री चव्हाण, प्रभा नरसिहन, साई भोईर, विनोद, किरण, नेहा चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.