पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे मागणी

इमेज
  गुरचरण जमिनीवर अतिक्रमण हटविण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्या- माजी आमदार नरेंद्र पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे  मागणी कल्याण ( प्रतिनिधी) :- सरकारी गुरचरण जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भात शासन मार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे,  राज्यातील अनेक भटके विमुक्त व इतर घटक गुरचरण जमिनीवर आपले वास्तव्य करत आहेत, त्यांच्यावर या निर्णयामुळे अन्याय होणार आहे, मोठ्या संख्येने वंचित घटक यागुरचरण जमिनीवर राहत असताना मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाने ही कारवाई होत आहे मात्र शासनानेही हा निर्णय पारित केला आहे, या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून स्थगिती देण्यात यावी व वंचित आणि भटक्या विमुक्त समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी ही मागणी कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. गेली अनेक वर्षे भटका विमुक्त समाज या शासकीय गायरान जमिनीवर वास्तव्य करत असून, उच्च न्यायालयाने निष्कासित करण्याच्या अनुषं

माजी आमदार नरेंद्र पवार

इमेज
  माजी आमदार नरेंद्र पवार यांची जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड                कल्याण (प्रतिनिधी):-  जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी कल्याण पश्चिम येथील माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. साल 2022 ते 2027 या पंचवार्षिक वर्षांसाठी त्यांची निवड झाली आहे. नरेंद्र पवार हे या अगोदरही जनकल्याण बँकेच्या संचालक पदावर होते, त्यांची ही तीसऱ्यांदा निवड झाली आहे.                 जनकल्याण सहकारी बँक ही सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था आहे, गेली 46 वर्षांपासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात काम करणारी ही बँक आहे. गेल्या 46 वर्षांपासून सुरू असलेल्या या बँकेत आज 2130 कोटींच्या ठेवी आहेत, तर 972 कोटी रुपये कर्ज वाटपाची रक्कम आहे. एकूण बँकेचे 62 हजार सभासद आहेत. त्या सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने मोठा पल्ला गाठला आहे, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत अभ्यासू आणि प्रामाणिकपणे काम करणारे नरेंद्र पवार जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही अत्यंत अभ्यासूपणे काम करत आहेत. त्यांची निवड झाल्या

भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

इमेज
  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया स्थगित करा- माजी आमदार नरेंद्र पवार  भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप  कल्याण (प्रतिनिधी) :- ठाणे जिल्हा मध्यवर्ती को ऑप बँकेच्या भरतीमध्ये असूत्रता असून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करून सदर भरती प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे, याबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यात ही मागणी केली आहे.  दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने  दिनांक २६-०८-२२ रोजी उमेदवारांकडून  नवीन अर्ज मागितले होते. सदर पदभरती प्रक्रियेत अनेक युवकानी सहभाग घेतला आहे. दिनांक २४.०९.२२ रोजी परिक्षा प्रक्रिया झाली असून नुकताच निकाल व यादी जाहीर झाली असून या भरती प्रक्रियेत अनधिकृत रित्या आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप झाला आहे. भरती प्रक्रिया नियमानुसार न होणे,  मेरीट प्रमाणे भरती न होणे, व योग्य उमेदवाराची पदभरती न होणे या प्रकारामुळे भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ निदर्शनास आला असल्याचा आरोप नरेंद्र पवार यांनी केला आहे.  त्यामुळे सदर भरती प्रक्रियेवर स

काँग्रेस पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही

इमेज
  काँग्रेस पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे  मुंबई(प्रतिनिधी) :- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती पंजाने पकडली आहे. राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ते भंडारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, खा. सुनील मेंढे, भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे, आ. परिणय फुके आणि प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याचे सहप्रमुख मा. विजय चौधरी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेना केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयामुळे राजकीयदृष्ट्या जिवंत आहे. ज्या नेतृत्वाने हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला त्यांनी मशाल किंवा अन्य कोणतेही चिन्ह घेतले तरी त्यांना रा

भागव्यामय वातावरणात तिरंगा रॅली,

इमेज
  कल्याण मध्ये निघाली,भागव्यामय वातावरणात तिरंगा रॅली          कल्याण(प्रतिनिधी):- ‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. कल्याण पश्चिम येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती नवनीतानंद  महाराज ( मोडक महाराज ) यांच्या सूचनेनुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सकाळी 11 वाजता फॉरेस्ट कॉलनी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत गुरुबंधू व गुरुभगिनी भगवेवस्त्र परिधान करून पायी यात्रा काढण्यात आली यावेळी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती, सर्वांच्या हातात तिरंगा ध्वज व देश भक्तीपर घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली,          फॉरेस्ट कॉलनीतील मठापासून सुरू झालेली पदयात्रा मुरबाड रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून काळा तलाव बेतूरकर पाडा खडकपाडा मार्गे पुन्हा मठात येऊन महाभांडारा घेऊन सांगता झाली, यावेळी गुरुवर्य नावनीतानंद महाराज मोडक महाराज यांच्या सह माजी आमदार नरेंद्र पवार, माजी परिवहन सदस्य बाळा परब, अशोक गायकवाड यांच्या सह शेकडो स्वामी भक्त उपस

स्वामी समर्थ मठाचा उपक्रम

इमेज
  सामाजिक भान जपत ध्वजावरोहन साजरे स्वामी समर्थ मठाचा उपक्रम             कल्याण( प्रतिनिधी):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी वाढत राहावी याकरिता देशभर ‘हर घर तिरंगा‘ अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज जवळील फॉरेस्ट कॉलनी मधील स्वामी समर्थ मठात आदरणीय गुरुमाऊली नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज ) यांच्या हस्ते आज 13 रोजी राष्ट्रध्वजचे ध्वजारोहण करण्यात आले,             ‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. कल्याण पश्चिम येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती नवनीतानंद  महाराज ( मोडक महाराज ) यांच्या सूचनेनुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी फॉरेस्ट कॉलनी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत गुरुबंधू व गुरुभगिनी भगवेवस्त्र परिधान करून पायी यात्रा काढण्यात येणार असून सर्वांच्या हातात तिर

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी, सामान्य जनतेला दिलासा,

इमेज
  पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी, सामान्य जनतेला दिलासा, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,   कल्याण ( प्रतिनिधी):- पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले आहे.          एका प्रसिद्धी पत्रकात शशिकांत कांबळे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी सातत्याने केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी हवी!

  पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा आरोप : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी हवी! भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची केंद्र सरकारकडे मागणी           कल्याण ( प्रतिनिधी):- काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. अन्सारी यांच्यावरील वादग्रस्त आरोपांवर काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे ते म्हणाले.           सन २००७ ते २०१७ या काळात हमीद अन्सारी हे देशाचे उपराष्ट्रपती होते. याच काळात त्यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार या नात्याने दौरे करताना भारतातील महत्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळविल्याचा गंभीर गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे. एकदा दोनदा नव्

स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

इमेज
  स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा            कल्याण (प्रतिनिधी):- येथील स्वामी समर्थ मठात सकाळी काकड आरतीने गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली त्यानंतर संपूर्ण मठात रांगोळी काढली व स्वामी पूजना नंतर आरती होमहवन होऊन भंडारा सुरू करण्यात आला यावेळी सुमारे 10 ते 12 हजार भाविकांनी दर्शन व भांडाऱ्याचा लाभ घेतला, यावेळी अनेक मान्यवर पाहुण्यांचा सन्मान गुरुवर्य नवनीतानंद महाराज यांनी केला,            कल्याण मधील बिर्ला कॉलेज जवळील सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण, संचालित स्वामी समर्थ मठ हे एक जागृत देवस्थान आहे,  गुरुवर्य नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज) यांनी बिर्ला कॉलेज जवळील फॉरेस्ट कॉलनी मध्ये स्वामी समर्थ मठाची स्थापना केली, नवनीतानंद महाराजाच्या  प्रदीर्घ साधना व पूजा अर्चना मुळे स्वामी समर्थ मठ हे जागृत देवस्थान बनवले आहे,          स्वामी समर्थ मठात भाविकांना स्वामी समर्थ सोबतच साईबाबा, गजानन महाराज, कोकणातील जागृत मोराई देवी, शंकर महाराज, दत्तगुरु, गणपती गजानन, शिव शंकर, छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, संतोषी माता, दक्षिणमुखी मारुती, पिंपलेश्वर, आदी देव

स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या नावाने सोलापुरात क्लिनिकचे उद्घाटन

इमेज
 स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या नावाने सोलापुरात क्लिनिकचे उद्घाटन स्व. मातोश्रीच्या नावाने क्लिनिकच्या रूपाने सेवाकार्य सुरू झाल्याचा आनंद - माजी आमदार नरेंद्र पवार         कल्याण ( प्रतिनिधी) :- संत कैकाडी महाराज विमुक्त भटक्या जाती जमाती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मातोश्री स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या स्मरणार्थ सोलापूर येथील सेटलमेंट कॉलनी येथे स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.           खरंतर माझ्या स्व. आईच्या स्मरणार्थ एखादे सेवाकार्य सुरू होणं आणि तेही रुग्णसेवेच्या माध्यमातून होणं हे अत्यंत आनंददायी आहे. आई गेल्यानंतर मोठं दुःख झालं, कारण माझ्या आजच्या जडणघडणी आणि वाटचालीमध्ये समाज आणि इतर सर्व घटकांपेक्षा मोठा वाटा माझ्या आईचा आहे. कारण आईनेच मला समाजातल्या चांगल्या गोष्टीपर्यंत पोहचवले. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे क्लिनिक सोलापूरमध्ये छोट्या स्वरूपात जरी सुरू झाले असले तरी येणाऱ्या काळात सोलापूरातील सर्व घटकांना नाममात्र दरात दर्जेदार उपचार मिळती

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

इमेज
  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कल्याण, दि. ११ (प्रतिनिधी) :  नियोजित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आज दिले. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कल्याणहून मुरबाडपर्यंत रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या प्रयत्नानेच या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये श्री. कपिल पाटील यांनी केली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुंबईत आज भेट घेतली. तसेच नियोजित रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी देण्याची विन

सरकार कोसळले

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा व आमदारकीचा राजीनामा,

मोदी यांच्या निष्कलंक नेतृत्वावर न्यायालयापाठोपाठ जनतेचेही शिक्कामोर्तब!

इमेज
  मोदी यांच्या निष्कलंक नेतृत्वावर न्यायालयापाठोपाठ जनतेचेही शिक्कामोर्तब! भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन, कल्याण (प्रतिनिधी):- तब्बल वीस वर्षांच्या न्यायालयीन संघर्षास संयमीपणे सामोरे जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील काँग्रेसच्या जकिया जाफरी यांची याचिका निकाली काढून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब केल्याने भारतीय जनता पार्टीची मान अभिमानाने उंचावली आहे. ही मोदी यांच्यासाठी आणि भाजपसाठी सर्वोच्च समाधानाची बाब असून ताज्या पोटनिवडणूक निकालाने देशातील सर्वसामान्य जनतादेखील मोदी आणि भाजपसोबत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेवर भाजपचा पूर्ण विश्वास असल्यामुळेच वीस वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढाईत भाजपने कोठेही शक्तिप्रदर्शन, आंदोलने किंवा टीकाटिपणी करून न्यायप्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असा टोला त्यांनी विरोधी पक्षांना मारला. याउलट, या प्रक्रियेस संयमाने सा

समन्वय प्रतिष्ठान चा उपक्रम

इमेज
  सामाजिक बांधिलकी जपत  विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, समन्वय प्रतिष्ठानचा उपक्रम कल्याण (प्रतिनिधी):- उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. तसेच शिक्षणापासून एकही मुल वंचित राहु नये आणि सामाजिक गरीबीमुळे विद्यार्थ्यांचे प्रगतीला बाधा येऊ नये म्हणून शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक बांधिलकीने दरवराबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन कल्याण येथील समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड. जनार्दन टावरे यांनी केले. दि. २६ जून २०२२ रोजी मुरबाड तालूक्यातील करपट वाडी, टोकावडे येथिल जिल्हा परीषद शाळेत समन्वय प्रतिष्ठान तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड. टावरे यांनी पुढे सांगितले की, शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना निर्माण झाली पाहिजे म्हणून आनंददायक शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्याचप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्तीची वाढ होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश देऊन पर्यावणाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी सामाजिक

माजी नगरसेवकाची विकासकाला धमकी विकासकाची पोलिसांत तक्रार

  कल्याण : विकासकाच्या इमारतीत विकत घेतलेल्या बांधकामाचे पैसे विकासकाने मागितल्याने डोंबिवलीतील मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर यांनी विकासक संजयकुमार मकनजी ठक्कर यांना शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप संजयकुमार ठक्कर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस उपायुक्तांना पत्र देऊन संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.             संजयकुमार ठक्कर हे सर्वे न. १४५, ही. न.३ व प्लॉट न. ५ या भूखंडावरती अधिकृत इमारतीचे बांधकाम करीत आहे. या इमारतीमध्ये मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर यांनी ठक्कर यांच्याकडून २८०० चौ फू बांधकाम अल्प दराने विकत घेतले होते. त्याची किम्मत १ कोटी १४ लाख देण्याचे ठरले होते. ठक्कर यांना आतापर्यंत १० लाख रुपयेच देण्यात आले. सध्य स्थतीत इमारतीचे बांधकाम ९०% पेक्षा अधिक झालेले आहे.  त्यामुळे प्रकाश भोईर यांच्या कड़ून जेवढे बांधकाम झालेले आहे तेवढ्या पैशाची मागणी केले असता त्यांनी ठक्कर यांना शिवीगाळ करून तुला एकही रुपया देणार नाही तुला काय करायचे आहे ते कर असे बोलून तू या इमारतीच्या साईटवर आल्याबर तुझे हातपाय तोडतो व