जेष्ठ कलावंतांची परिस्थिती अत्यंत हलाखीची

जेष्ठ कलावंतांची परिस्थिती अत्यंत हलाखीची

                           - विसुभाऊ बापट

डोंबिवली :- आज अनेक जेष्ठ कलावंतांची परिस्थिती
अत्यंत हलाखीची आहे. ताणतनावात असलेल्या असे कलावंत व्यसनाच्या आहारी
गेले आहेत. जेष्ठ कलावंताना पेन्शनहि कमी आहे. अश्या कलावतांसाठी सर्व
कलावंतांची संघटना काढली आहे असे सांगत आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश
संयोजक ( अध्यक्ष ) विसुभाऊ बापट यांनी अनेक जेष्ठ कलावंतांच्या
परिस्थितीवर प्रकाश टाकला. डोंबिवलीत पतंग कवितोत्सव २०१५ च्या पारितोषिक
सोहळ्यात ते बोलत होते.

    भाजपा प्रभाग क्र.८९ राजाजी पथ आणि कला-सांकृतिक प्रतिष्ठान यांच्या
संयुक्त विद्यमाने शास्त्री सभागुहात भाजपा महिला आघाडी कल्याण जिल्हा
उपाध्यक्षा तथा कला- सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा
निष्ठा भागवतुला यांनी आजोजित केलेल्या पतंग कवितोत्सव २०२५ च्या
पारितोषिक सोहळा संप्पन झाला.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे तथा कार्यक्रमाचे
अध्यक्ष म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश संयोजक ( अध्यक्ष ) विसुभाऊ बापट
उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, पतंगावर कविता लिहिण्याचा आणि त्या सदर
करण्याची हि अप्रतिम कल्पना आहे. गेली ३४ वर्षे मी मराठी कविता संग्रहित
करीत आहे. शब्दांची ताकद मोठी आहे. देशाभिमान जागृत करण्यासाठी प्रयत्न
झाले पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कल्पनेतून हि संकल्पना
समोर आहे. गेली दीड वर्षे भाजपा कला- सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष म्हणून
काम करीत आहे. हे काम करीत असताना काला कारांच्या अडचणी समजावून घेण्याचा
प्रयत्न करीत आहे. यावेळी आयोजित केलेल्या कवी संमेलनात जेष्ठ साहित्यिक
तथा कवियित्री लीला शहा, द्या घोंगे,कवी विकास अधिकारी, आनंद पेंढारकर,
सुभाषकुमार बागी,विशाल राजगुरू, मंदाकिनी भावे, राजीव जोशी, आदेश इनामदार
आणि ठाण्यातील शिल्पा देशपांडे यांनी सुरेख कविता सदर केल्या. तर उपस्थित
रसिक श्रोत्यांमधील गीता भावसार,मकरंद, विशाखा डावकर , जयश्री मोडक यांनी
मराठीतून आणि अलका गाथे यांनी गुजराथीतून कविता सदर केली. निमंत्रित
कवीच्या कवितांना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.त्यानंतर  जानेवारी
महिन्यात पार पडलेल्या पतंग कवितोत्सव २०१५ स्पर्धेत सहभागी झालेल्या
स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. पुढे या
स्पर्धेतील प्रथम क्रमांक विशाखा डावखर ,द्वितिय क्रमांक किरण जोगळेकर ,
तृतीय क्रमांक द्या घोंगे  तर उत्तेजनार्थ विलास अधिकारी यांना प्रमुख
पाहुणे ) विसुभाऊ बापट ,अडओकेट माधवी नाईक, नीरजा मिश्रा, उज्वला दुसाने,
ज्योती पाटकर , माजी नगरसेवक राजेश मोरे, डॉ. राजुराम यांच्या हस्ते
पारितोषिके देऊन गौरविण्यात आले होते. या पतंग कवितोत्सव २०१५ च्या वेळी
माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, सागाव-सांगरली
ग्रामपंचायत समितीचे सरपंच महेश पाटील,महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी
सदस्य के, आर. जाधव , डोंबिवली पूर्व शहराध्यक्ष तथा शिक्षण मंडळ समितीचे
सदस्य शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस नंदू जोशी आदि मान्यवरांनी
उपस्थित दर्शविली. यावेळी भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी सूत्रसंचालन निष्ठा भागवतुला यांनी त्या आभार प्रदर्शनाची
जबाबदारी नारायणकांत भागवतुला यांनी सांभाळली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत