महिनाभरात डोंबिवलीतील कॉंक्रिटचे रस्ते उखडले ,

महिनाभरात डोंबिवलीतील कॉंक्रिटचे रस्ते उखडले ,
सत्ताधारी आणि विरोधकांत रंगला कलगीतूरा

    डोंबिवली पूर्वेतील कल्याण रोड हा कॉंक्रिटचा रस्ता जागोजागी उखड़ला
गेल्याचे समोर आले आहे . कल्याण रोडचे कॉंक्रिट करण्याचे काम गेल्या ८
महिन्यान पासून चालू होते . फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा रस्ता
वाहतुकीसाठी खुला करण्यात आला . पण महिन्याभरात ह्या रस्त्याला तडे गेले
आहेत . कॉंक्रिटचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले असून या वरून
सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतूरा रंगला आहे
.

     कल्याण पूर्वेतील काही रस्ते तसेच डोंबिवली मधील राजाजी रोड ह्या
कॉंक्रिट रस्त्यांना तडे गेल्याची घटना पुढे आली आहे . काही दिवसां
पूर्वी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ह्यांनी रस्त्यांची पाहणी केली
होती . राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोथान
महाअभियानांतर्गत ३७६.०१ कोटी रुपये खर्च करून कॉंक्रिटचे रस्ते एकूण २३
ठिकाणी बनवण्याचे काम चालू आहे . पहिल्या टप्या मध्ये डोंबिवलीतील
मानपाडा रोड , राजाजी पथ , फडके रोड व कल्याण रोड ह्या ४ रस्त्यांचे
कॉंक्रिट करण्याचे काम चालू आहे . यातील डोंबिवली पूर्वेत राजाजी रोड आणि
टिळक चौक ते घरडा सर्कल चौक या कल्याण रोडला महीनाभराच तडे गेलेले
जागोजागी दिसून येत आहेत . कॉंक्रिट रस्त्यांच्या या कामांमध्ये मोठा
भ्रष्टाचार झाला आहे . त्याच बरोबर रस्त्यांची कामे देखिल संथ गतीने चालू
असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार होत आहे .
.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत