परिवहन कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम नाही,
परिवहन कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम नाही, कल्याण,/ कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे ६१५ कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून मेडिक्लेमची मागणी करत आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने परिवहन समितीचे सदस्य संतोष चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एखादा कर्मचारी आजारी पडल्यास त्याचा रुग्णालयातील खर्च ऊचलण्यासाठी परिवहन कर्मचारी प्रत्येकी १०० रुपये काढून हॉस्पिटलचे बिल भारतात . २०१२ साली परिवहन समितीच्या सभेत परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. शुक्रवारी परिवहन समिती सभापती आणि सदस्यांनी डोंबिवली येथील परिवहन सेवेच्या तुटक्या केबिनची पाहणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मेडिक्लेमची मागणी केली. सदस्य संतोष चव्हाण यांचा पाठपुरावा याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला आहे. डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील जागा डोंबिवलीतील परिवहन कर्मचाऱ्यांना कामासाठी मिळावी म्हणून परिवहन समिती सभापती संजय पावशे सदस्य संजय राणे आणि संतोष चव्हाण यांनी पाहणी केली. त्यानंतर इंदिरा चौकात