मच्छी बाजाराने नागरिक त्रस्थ

फुटपाथ वरील मच्छी बाजाराने नागरिक त्रस्थ

कल्याण / कल्याण स्टेशन जवळील एसटी बस स्थानका जवळ भरत असलेल्या अनाधिकृत मच्छी बाजाराने बस स्थानकातील प्रवासी व फुटपाथ वर चालणारे नागरी त्रस्थ झाले आहेत. या अनधिकृत भरणाऱ्या मच्छी बाजाराने बसच्या प्रवाश्याना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.तर नागरिकांना या मच्छी विक्रेत्या मुळे चालायला त्रास होत असून मच्छीची घाण पसरल्याने नागरिकांना नाक मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
    या   त्रासा बद्दल येथील नागरिकांनी स्थानिक भाजपा नगरसेवक सचिन खेमा यांना तक्रार केल्याने त्यांनी या बाबत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला पत्र दिले असून या अनधिकृत मच्छी बाजारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर हा मच्छी बाजार उठविण्यात आला नाही तर आपण या अनाधिकृत मच्छी बाजाराच्या विरोधात महासभेत आवाज उठवू असे या बाबत नगरसेवक सचिन खेमा यांनी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरटीई अंतर्गत सण 2018 चे एडमिशन थांबवावे लागतील - शाळांच्या संघटनेचा इशारा

नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक