परिवहन कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम नाही,

परिवहन कर्मचाऱ्यांना  मेडिक्लेम नाही,

   कल्याण,/      कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे  ६१५ कर्मचारी गेल्या अनेक  वर्षापासून मेडिक्लेमची मागणी  करत आहे.  मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने    परिवहन समितीचे  सदस्य  संतोष चव्हाण यांनी  नाराजी व्यक्त  केली आहे. एखादा कर्मचारी आजारी पडल्यास त्याचा  रुग्णालयातील खर्च ऊचलण्यासाठी परिवहन कर्मचारी  प्रत्येकी १०० रुपये काढून हॉस्पिटलचे बिल भारतात . २०१२  साली परिवहन समितीच्या सभेत  परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना  मेडिक्लेम देण्याचा ठराव मंजूर  करण्यात आला होता. शुक्रवारी परिवहन समिती सभापती आणि सदस्यांनी डोंबिवली येथील परिवहन सेवेच्या तुटक्या केबिनची पाहणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मेडिक्लेमची मागणी केली.   सदस्य संतोष चव्हाण यांचा पाठपुरावा याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला आहे. 


          डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील जागा डोंबिवलीतील  परिवहन कर्मचाऱ्यांना कामासाठी मिळावी म्हणून परिवहन समिती सभापती संजय पावशे  सदस्य संजय राणे  आणि संतोष चव्हाण यांनी पाहणी केली. त्यानंतर इंदिरा चौकातील  परिवहन सेवेच्या तुटक्या केबिनची पाहणी केली. यावेळी येथील बसचालक आणि वाहक यांनी सभापती आणि सदस्यां बरोबर  चर्चा केली. परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी सदस्य संतोष चव्हाण यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम बाबत चर्चा केली.

          २०१२ साली परिवहन समितीच्या सभेत परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या  मेडिक्लेमचा ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर महासभेतहि पालिकेतील कर्मचारी आणि परिवहन सेवेतील कर्मचारी त्यांना मेडिक्लेम देण्याचा ठराव मंजूर झाला होता.  मेडिक्लेम कंपनीला प्रशासनाने संपर्क साधल्यावर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची माहिती कंपनीने मागितली होती. मात्र पालिका प्रशासनाने यानंतर याकडे लक्ष दिले नाही. दर सहा महिन्यांनी  पालिका प्रशासनाला  मेडिक्लेम कंपनीला वर्षाभरात १६ ते १७ लाख रुपये भरावे लागणार आहे. याबाबत सदस्य  चव्हाण म्हणाले , कर्मचाऱ्यांच्या   मेडिक्लेमबाबत फायलन झाले होते. मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत