जागतिक रंगभूमीदिनी पत्रकार शंकर जाधव यांचा सत्कार


जागतिक रंगभूमीदिनी  पत्रकार शंकर जाधव यांचा  सत्कार



डोंबिवली :- ( प्रतिनिधी )  जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद डाेंबीवली शाखेच्या वतीने  आनंद बालभवन येथे  पार  पडलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार सोहळ्यात  महापौर राजेंद्र देवळेकर यांनी नाट्यकर्मिंच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.


  कार्यक्रमात नृत्य या संस्थेच्या स्वप्ना कुंभार देशपांडे आणि  ३० नृत्य कलाकार यांनी नांदी ,शिव वंदना, लावणी ,लावणी पाश्चात्य ठेका,गरबा,भोंडला आणि इतर नृत्य प्रकार  सादर केले.प्रा डॉ प्रसाद भिड़े तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे ह्यांनी वि. वा. शिरवाडकर - कवी मनाचा नाटककार हा सुंदर कार्यक्रम सादर केला.

विनोदी विडंनात्मक संस्कृत नाट्य कदौघ ( संदर्भ कट्यार काळजात घुसली ) लेखक दिग्दर्शक सादरकर्ते युवराज ताम्हणकर आणि सहकारी यानी सादर केले.यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर आणि सभागृह  नेते राजेश मोरे  यांच्या हस्ते सु. श्री. इनामदार, भालचंद्र कोल्हटकर , सुरेश सरदेसाई , रमेश भिडे , विवेक जोशी आणि डॉ. संजय रणदिवे अश्या सहा ज्येष्ठ रंगकर्मीचा तसेच रंगभूमि संबंधी समस्याना वाचा फोडणाऱ्या पत्रकार शंकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवलीतील   अभिनेता नंदू गाडगीळ , नाटककार प्रवीण शांताराम,आनंद म्हसवेकर,माधव जोशी ,मदन जोशी,सुरेश देशपांडे  उपस्थित होते. यावेळी महापौर देवळेकर म्हणाले ,  राज्य हौशी नाट्य स्पर्धा  डोंबिवलीतील  सावित्रीवाई फुले कलामंदिर येथे होणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर यांनी केलेल्या मागणीनुसार डोंबिवलीतील नाट्य कट्टा  स्टेशन जवळ द्यावे अशी मागणी केली.  कार्यक्रमात मनोगत अध्यक्ष दिलीप गुजर यांनी तर  दुर्गराज जोशी आणि स्वप्ना कुंभार देशपांडे यांनी निवेदन केले.यावेळी अध्यक्ष दिलीप गुजर , उपाध्यक्ष भारती ताम्हणकर , कोषाध्यक्ष केतन दुर्वे ,कार्यावाहक निशिकांत रानडे , सदस्य राहुल कामत, सदस्य - दुर्गराज जोशी ,विवेक ताम्हणकर , शुभदा गोडसे , सुवर्णा केळकर , बापू राऊत यांनी अथक , मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत