नोटबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक
नोटबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक
कल्याण / संपूर्ण देशाला ढवळून काढणाऱ्या
नोटबंदीच्या निर्णयाला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे कल्याणात 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा सामान्य जनतेलाच प्रचंड तोटा झाल्याचे सांगत त्यामूळे १२० जणांना नाहक जीव गमवावा लागला. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे येत्या बुधवारी 'ब्लॅक आऊट डे' आंदोलनाची हाक देण्यात आल्याची माहिती सुहास कोते यांनी दिली. या आंदोलनांतर्गत येत्या ८ तारखेला रात्री ८ वाजता आपापल्या घरातील आणि परिसरातील दिवे (लाईट) अर्धा तास बंद ठेऊन नोटबंदीचा निषेध केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या, बँकेसमोरील रांगेत देशाच्या झालेल्या लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या या तुघलकी निर्णयाविरोधात सर्वांनी 'ब्लॅक आउट' करून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही राष्ट्र सेवा दलातर्फे करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------
युद्धाच्या वेळेस" ब्लॅक आऊट" केले जात असताना आता राष्ट्र सेवा दलाने नोट बंदीच्या निषेधार्थ ब्लॅक आऊट ची हाक दिल्याने ही नोट बंदी राष्ट्र सेवादला आणीबाणी सारखीच वाटत असल्याचे या बाबत दिसून येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा