डोंबिवलीत कोकण संस्कृतीचे दर्शन...


डोंबिवलीत कोकण संस्कृतीचे दर्शन...
                - खासदार  डॉ. श्रीकांत शिंदे   


कल्याण , 
  डोंबिवलीत  कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या महोत्सवाला गर्दी वाढत आहे. खरं तर आयोजकांचे अभिनंदन केले पाहिजे . कारण डोंबिवलीकरांना  कोकण संस्कृतीचे दर्शन घडवले जात आहे, असे  प्रतिपादन  कल्याण लोकसभा मतदार संघाचे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महोत्सवाला भेट दिल्यानंतर केले,


     रविवार १९ तारखेपर्यत डोंबिवली पूर्वेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथे कोकण महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाचे आयोजन कोकण एकता  प्रतिष्ठानचे भाई   पानवडीकर यांनी केले आहे.   या महोत्सवात महिलांसाठी ` भोंडला`, लहान मुलांसाठी  मॅजिक शो, मोफत भेटवस्तू , श्री देवी भगवती दशावतार नाट्यमंडळ ( मुणगे , देवगड ) नृत्य अविष्कार , लावणी महाराष्ट्राची , महाराष्ट्रातील पहिली महिला सांबल वादक सुलभा सावंत संचालित लोकसंगीताचा जागर आणि देवीचा पारंपरिक गोंधळ असे कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवात प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम , कुशल बद्रिके , अभिनेता स्वप्नील जोशी , शनया  , सुकन्या काळण , प्रिया शेलार , क्राईम डायरी फेम सतीश  नायकोडी  यांची विशेष उपस्थित राहणार आहे. या महोत्सवाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट दिल्यानंतर आयोजक भाई पानवडीकर  यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना शमहिला संघटक हरप्रमुख   राजेश मोरे , नगरसेवक विश्वनाथ राणे, शिवसेना कविता गावंड यासह  अनेक मान्यवर उपस्थित होते.  याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी  नामदेव शिंपी समाजाच्या सर्व मंडळीनी या कार्यक्रमात महाराष्ट्राचे  दर्शन घडविल्याबबद्दल त्याचे कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत