नागरिकांसाठी पदपथ मोकळे करा

नागरिकांसाठी पदपथ मोकळे करा. ! आयुक्‍त पी. वेलरासू

कल्‍याण  -
महापालिका हद्दीतील पदपथ नागरिकांसाठी मोकळे करा,असे आदेश महापालिका आयुक्‍त पी. वेलरासू यांनी प्रभाग क्षेञ अधिका-यांना दिले.सोमवारच्या साप्‍ताहिक आढावा बैठकीत आयुक्‍तांनी आज विविध कामांचा आढावा घेतला.फेरीवाल्‍यां संदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे कारवाई करीत असल्‍याने, आयुक्‍तांनी त्‍यांचे कौतुक केले.नागरिकांना चालणे-फिरणे सोपे जाण्‍याच्‍या दृष्‍टीने रस्‍त्‍यालगत असलेला पदपथ  मोकळे करण्‍याचे आदेश आयुक्‍तांनी दिले.

ज्‍या दुकानदारांनी अथवा गाळेधारकांनी पदपथ काबीज केले आहेत, अशांनी स्‍वतःहून केलेली अतिक्रमणे त्‍वरीत काढून घ्‍यावेत. अन्‍यथा दुकानदार अथवा गाळेधारकांनी (पदपथावर) केलेली अतिक्रमणे महापालिकेने काढल्‍यास, त्‍याचे शुल्‍क संबधित व्‍यावसायिकाकडून वसूल केले जाईल, याची खबरदारी घ्‍यावी,असा इशारा आयुक्‍तांनी दिली.

याशिवाय महापालिकेकडे हस्‍तांतरित झालेले वा आरक्षित असलेले भूखंड मोकळे करण्‍यात यावेत असे निर्देश देवून, नगररचना विभागाने अशा भुखंडांची सविस्‍तर माहिती प्रभाग क्षेञ अधिका-यांना दयावी. प्रभाग क्षेञ अधिका-यांनी ज्‍या भूखंडांवर अतिक्रमणे झालेली आहेत, असे भूखंड या महिन्‍याअखेर मोकळे करावेत, असे आदेश त्‍यांनी दिलेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत