निधी नसताना प्रभागात 30 लाखाची कामे
महापालिकेत निधी उपलब्ध नसताना प्रभागात ३० लाखाची विकास कामे
कल्याण / कल्याण डोंबिवली महापालिकेत निधीची चणचण जाणवत आहे. असे असताना मात्र प्रभाग क्रमांक ४३ मेट्रो मॉल , गावदेवी येथे ३० लाखाची विकास कामे सुरू करण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथील स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनी आमदार निधीतून हा फंड मिळवला असून येथिल नागरिकांच्या मागणी नुसार गटार व पायवाटाचे कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ४३ मध्ये गोसावी पुरा, सबरजित चाळ हा दाटीवाटी चा भाग आहे . येथील नागरिकांची येथे गटारे व पायवाटा बनविण्याची अनेक दिवसाची मागणी होती. या बाबत स्थानीक नगरसेवक नवीन गवळी या साठी महापालिकेकडे सतत पाठपुरावा करीत होते. पण महापालीके कडून निधी उपलब्ध नसल्याने ही कामे होत नव्हती.
ही प्रभागातील कामे होत नसल्याने या बाबतचा तगादा नागरिकांनी नगरसेवक नवीन गवळी यांच्या कडे लावला असता त्यांनी या बाबत आमदार निधीतून हा ३० लाखाचा निधी मिळवला. या गटारे व पायवाटाच्या कामाचे भूमिपूजन स्वताच्या हस्ते न करता त्यांनी हा भूमीपूजनाचा मान स्थायिक नागरिकांना देऊन हे भूमिपूजन केल्याने नागरिक नगरसेवक नवीन गवळी यांचे आभार मानले आहेत. महापालिका निधी देत नसल्याची खंत या वेळी नगरसेवक नवीन गवळी यांनी व्यक्त करीत ही कामे सुरू झाल्याचा आनंद झाल्याच्या या वेळी त्यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा