विधानसभेसाठी भाजपची तयारी सुरू
विधानसभेसाठी भाजपची तयारी सुरू 4 जागांसाठी 3 आमदारांसह 22 इच्छुक कल्याण, :- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाने आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चार विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या नगरसेविका मनीषा तारे यांचे पती साईनाथ तारे कल्याण पश्चिम भाजपतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कल्याण पश्चिमेतील विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत असल्याने भाजप याठिकाणी शिवसेनेला बेसावध ठेवण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण आणि डोंबिवली अशा 4 विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवण्यास 22 जण इच्छुक आहेत. पक्षाचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी डोंबिवली येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. निरीक्षकांचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सादर केल्यानंतर उमेदवारीबाबत पक्षनेतृत्व अंतिम निर्णय घेईल असे देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण पश्चिमेतील विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांनी तसेच ज्य