मनसेचा मराठी बाणा
कल्याणात मनसेचा मराठी बाणा
मराठी पदवीत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर दोन वेतनवाढ दया -मनसे सचिव इरफ़ान शेखकल्याण :- केडीएमसीतील मराठी पदवीत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर दोन वेतन वाढ द्या अशी मागणी मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी केली आहे .मनसे याबाबत सलग तिन वर्षे पाठपुरावा करत असून येत्या महासभेत ठराव मंजूर न केल्यास आयुक्तांना घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा दिला शेख यानि दिल आहे .
मराठी भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन व्यवहार मराठी भाषेमध्ये करण्याचा निर्णय शासन दरबारी घेण्यात आला आहे. मात्र कल्याण डोम्बिवली पालिकेच्या शासकीय यंत्रणेत मराठी भाषेचा वापर तितक्या म प्रमाणात होत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पालिका कर्मचार्यांमध्ये मराठी भाषा शिकण्याची इच्छा निर्माण व्हावी या करिता मराठी विषयात पदवीत्तर शिक्षण घेतलेल्या कामगारांना प्रोत्साहनपर दोन वेतन वाढ देण्यात यावी अशी मागनी मनसे सचिव इरफ़ान शेख यानि केलि आहे या मागणीसाठी सलग तिन वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून या निर्णयाबाबत ठाणे, मुंबई महानगर पालिकेमध्ये झालेल्या ठरावाच्या प्रती पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे शेख यानि सांगितले .यावेळी मराठीच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या सेना भाजपला आपल्याच मराठी पदवीत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारे कर्मचाऱ्यांचा विसर पडला असल्याचा मनसे सचिव इरफ़ान शेख यांनी आरोप केला आहे. प्रत्येकवेळी केवल अश्वासनांवर बोलवण केलि जात असल्याने येत्या महासभेत ठराव न घेतल्यास आयुक्तांना घेराव घालनार असा इशारा शेख यानि दिला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा