मराठी भाष्या

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवलीत होणार जल्लोष

 डोंबिवली :-  दि. २४ ( प्रतिनिधी )

 वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिनी येत्या
शुक्रवारी २७ फेब्रुवारी सर्वत्र जागतिक मराठी भाषा दिन साजरा होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दिवशी डोंबिवलीत जल्लोष
साजरा करणार आहे. यासाठी मनसेने दोन दिवस आधीच जोरदार तयारी केली आहे.

      भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला पश्चिमेकडील भागशाळा तथा कान्होजी
जेथे मैदानात मराठी संस्कृतीचा वारसा जोपासणारा लोकशाहीर विठ्ठल उमप
थिएटर प्रस्तुत नंदेश उमप यांचा मी मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित
केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मनसेचे युवा नेते अमित ठाकरे
यांची उपस्थिती राहणार आहेत. यावेळी शहरातील विविध क्षेत्रात लक्षवेधी
काम करणाऱ्या ९ कर्तुत्ववान मराठी रत्नांचा गौरव करण्यात येणार आहे. या
कार्यक्रमाला चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील नामांकित कलाकार उपस्थित
राहणार आहेत.विभाग क्र. ०६ च्यावतीने उपशहराध्य तथा माजी नगरसेवक प्रकाश
भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली  विभाग  अध्यक्ष सुभाष कदम ,विभाग अध्यक्षा
नीलिमा भोईर, उपविभाग अध्यक्ष संदीप ( रमा) भास्कर म्हात्रे, सुरेश
मुणगेकर, ज्ञानेश्वर नेरपगारे, श्रीकांत वारंगे, गुणेश भोईर आणि
पदाधिकार्यांनी अथक मेहनत घेऊन पार पडलेल्या सुंदर मराठी स्वाक्षरी
स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
शुक्रवारी शहरातील मनसे नगरसेवक आणि पदाधिकारी हे आपापल्या भागात
रांगोळी, हस्ताक्षर, भित्ती चित्रकला, मराठी इतिहासकारांच्या माहितीचे
चित्रप्रदर्शन, मराठी शब्द प्रश्नमंजुषा अश्या विविध स्पर्धा घेणार
आहेत.या व्यतिरिक्त शहरात भव्य आकाश कंदील, चौका-चौकांत रांगोळ्या
काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच डोंबिवलीकर मनसेने
फेसबुक-व्हाटस अप रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. दारात काढलेल्या
रांगोळीचे फोटो सोशल मिडीयावर अप-लोड करणाऱ्या स्पर्धकांना  आकर्षक
पारितोषिकांनी गौरविण्यात येणार असल्याचे मनसे शहराध्यक्ष राजेश कदम
यांनी केले आहे. तसेच प्रभाग क्र. १०१ येथील नगरसेविका वैशाली-
दरेकर-राणे यांच्यावतीने २६ जानेवारी रोजी डोंबिवलीत प्रथमच प्रभागात
कुसुमाग्रज सांस्कृतिक कट्टा बनविण्यात आला होता. या कट्ट्याचे २७
फेब्रेवारी रोजी सांयकाळी साडे सात वाजता उदघाटन होणार आहे.यावेळी
कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन होणार आहे. तर प्रभाग क्र. १०० पाथर्ली –
गोपाळनगर १,२,३  हनुमान नगर यांच्या वतीने नगरसेविका मंदा पाटील यांच्या
मार्गदर्शखाली स्वच्छ सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली आहे. या
स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी सुंदर हस्ताक्षरात लेख लिहिला आहेत त्या
स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत