बातमी
डोंबिवलीकरांना येणार शिवकालीन शस्त्रे पाहण्याची संधी
डोंबिवली :- दि. २४ ( प्रतिनिधी)
छत्रपती शिवरायांपासून ते पेशव्यांपर्यतच्या शौर्याचा धगधगता इतिहास
जाणून घेण्याची व त्या काळातील शस्त्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी
डोंबिवलीकरांना मिळणार आहे. हे प्रदर्शन ७ ते ८ मार्च दरम्यान
पालिकेच्या विजयनगर ,आयरे गांवा येथील लालबहाद्दुर शास्त्री शाळेत सकाळी
९ ते रात्री ९ पर्यंत राहणार आहे.
विजयनगर उत्सव समिती गेली ३६ वर्षे सातत्याने विविध समाज उपयोगी
उपक्रम राबवत आली आहे.सध्याच्या पिढीला आपल्या इतिहासाची जाण व्हावी व
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारप्रेरणेस अनुसरून कर्तृत्ववान पिढी
घडावी हा मुख्य हेतू असल्याचे विजयनगर उत्सव समितीचे कार्यकर्ते
दत्तप्रसाद पराडकर यांनी सांगितले युद्धकाळात वापरण्यात आलेल्या मराठा,
मुघल, राजपूत तलवार, मराठा धोप, पट्टा, समशेर खंडा, पदकुंत, अश्वकंत,
गजकुंज आदि प्रकारातील भाले, मराठा कट्यार, मुघल कट्यार, हैद्राबादी
कट्यार, चामड्याच्या कातडीपासून तयार केलेल्या ढाली, गुंर्ज,शमशेर,
पोलादी भाला, तोफ, तोफेतील गोळे, मूठचे विविध प्रकार, कुकरी, वेगवेगळय़ा
प्रकारची वाघनखे, अस्वल पंजा आदी शस्त्रे प्रदर्शनात ठेवण्यात येणार
आहेत.
भव्य शस्त्र प्रदर्शनासोबतच अनुप मालंडकर संचालीत 'भ्रमर'
ट्रेकिंग संस्थेचे महाराष्ट्रातील विविध गड़कोटांचे छायाचित्र प्रदर्शन व
जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचे ऐतिहासिक विषयांवरील पुस्तक
प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. छायाचित्र व पुस्तकांच्या माध्यमातून
लोकांना इतिहास कळावा व यातून सर्वानी गड़कोटांची भ्रमंती व सवंर्धनासाठी
भ्रमर' मधे सहभागी व्हाव हा हेतु असल्याचे अनुप मालंडकर यांनी
सांगितले.या प्रेरणादाई उपक्रमास राही अॅकेडमी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव
मंदार गोविंद टावरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा