मनसे नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी

डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ७९ (गणेशमंदिर) चे मनसेचे नगरसेवक अमित सुलाखे
यांना विजय पाटील या बांधकाम व्यावसायिकाने जीवे ठार मारण्याची धमकी दिली
आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     नगरसेवक अमित सुलाखे यांच्या प्रभागातील ठाकूरवाडी येथील राजेंद्र
सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम बांधकाम व्यावसायिक विजय पाटील यांनी हाती
घेतले आहे. ते काम करण्यासाठी त्यांनी जेसीबी आणि पोकलनच्या सहाय्याने
तेथे  खड्डा करण्यास सुरुवात केली आहे. हे काम करत असतना शेजारीच
असलेल्या गंगेश्वर सोसायटीचा येण्याजाण्यासाठीचा रस्ता संपूर्ण खचला
गेल्याने येथील नागरिकांचा  मार्ग पूर्णपणे बंद झाला. गंगेश्वर
सोसायटीच्या रहिवाश्यांनी याबाबत स्थानिक नगरसेवक म्हणून सुलाखे यांच्या
कानावर हि बाब  घातली. नगरसेवक सुलाखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत
याबाबतचा जाब बांधकाम व्यावसायिक पाटील याला विचारला. तेव्हा चिडलेल्या
बांधकाम व्यावसायिक पाटील याने नगरसेवक सुलाखे यांना अरेतुरे ची भाषा
करीत  तुझी मर्डर झाली तरी चालेल मी इथे काम करून दाखवेन असे म्हणून तुला
बघून घेतो अशी दमबाजी केल्याचा गुन्हा विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल
करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप बांधकाम व्यावसायिक पाटील यांना अटक
केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरटीई अंतर्गत सण 2018 चे एडमिशन थांबवावे लागतील - शाळांच्या संघटनेचा इशारा

नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक