पालिका  आयुक्तंचि गाडी आणि फर्नीचर जप्त करा---कल्याण जिल्हा सत्र न्यायलयाचे आदेश 

       कल्याण :कल्यान नजिक असलेल्या खंबाळ पाडा येथील ख्रिश्चन समाजाच्या  स्मशान भूमि साठि आरक्षित असलेला भूखंड अतिक्रमने हटवुन लवकरात लकवर संबंधितांच्या ताब्यात दया असे   आदेश पालिका प्रशासनाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते . मात्र पालिकेकडून कार्रवाई न करण्यात आल्याने कल्याण डोम्बिवली महापालिका आयुक्तांची गाडी तसेच कार्यालयतील फर्नीचर जप्त करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायलयाचे  न्यायाधीश ए एच मार्लेचा यानी दिले आहेत . 
         कल्याण डोम्बिवली महापालिका विकास आराखड्यात  खम्बाळ पाडा येथील  1 हेक्टर  भूखंड ख्रिश्चन दफन भूमिसाठी राखीव करण्यात आला होता .मात्र  भूखण्डावर अतिक्रमण करन्यात आले होते .हे अतिक्रमण निष्कासित करुन सदर भूखंड ताब्यात द्यावा अशी मागणी ख्रिश्चन वेलफेयर असोशिएशन तर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती .
       मात्र तब्बल वर्षभराहून अधिक कालावधि  उलटूनही कारवाई न करण्यात आल्याने ख्रिश्चन वेलफेयर असोशिएशनने कल्याण जिल्हा न्यायालयात पालिकेविरोधात दावा दाखल करत सदर जागेचा ताबा देण्यात यावा अशी मागणी केलि होती .या प्रकरणी न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2013 रोजी  1 वर्षाच्या आत सदर जागेवरील अतिक्रमण हटवुन सदर जागा सबंधित संस्थेच्या ताब्यात द्यावी असे आदेश दिले होते .मात्र 1 वर्ष 166 दिवस उलटुनही पालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केलि नाही .त्यामुळे 23 फेब्रुवारी रोजी  कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एच मार्लेचा यानि कल्याण डोम्बिवली महापालिका आयुक्तांचे वापरातील  वाहन आणि कार्यालयतील फर्नीचर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरटीई अंतर्गत सण 2018 चे एडमिशन थांबवावे लागतील - शाळांच्या संघटनेचा इशारा

नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक