news



संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान
कल्याण :
निरंकारी बाबा सद्गुरु   हरदेव सिंगजी महाराज  यांच्या  वाढदिवसानिमित्य गुरुपूजा दिवसाचे औचित्य साधून कल्याण ब्रांच च्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.   सकाळी सात  वाजता या स्वच्छता अभियानाला बेतूरकरपाडा येथून कल्याण सेक्टर संयोजक  जगन्नाथ म्हात्रे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. कल्याण मधील   बेतूरकर पाडा शिशु विकास शाळा परिसर, काळा तलाव, शंकर मंदिर परsसर आदी ठिकाणी साफ सफाई करण्यात आली. कल्याण पूर्व भागात मेट्रो मॉल परिसर, नेतिवली परिसर, प्रबोधनकार ठाकरे शाळा, शास्त्री नगर, मलंग रोड, पिसवली, आडीवली, नांदिवली या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  कल्याण ब्रांच अंतर्गत येणाऱ्या कोनसरवलीरांजनोली, पिंपळास,पिंपनेरमाणेराद्वारलीबुर्दुल आदी ठिकाणी देखील  स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याचप्रमाणे डोंबिवली ब्रांच अंतर्गत सेक्टर संयोजक आर. आर. हजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत डोंबिवली शहरात साफ सफाई करण्यात आली. डोंबिवलीतील  मोठा गाव, रेल्वे स्टेशन परिसर, सत्यवान चौक, ठाकूरवाडी, कुंभारखान पाडा, नवापाडा, आयरे गाव, चोळे गाव, ठाकुर्ली, या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील भोपर, नांदिवली, सागाव, आजदे गाव, सागर्ली, लोढा हेवन – निळजे, कोळे गाव, सोनार पाडा, दावडी, गोळवली भागात स्वच्छता अभियानात मोठ्या संख्येने  निरंकारी भक्त सहभागी झाले होते.  तसेच काही ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी विवध फलकांद्वारे तसेच साफ सफाई करून निरंकारीभक्तांनी स्वच्छतेचा संदेश सर्वाना दिला. गुरुपूजा दिवसानिमित्य संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियानचे आयोजन निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत