नवी दिल्ली - करचुकविण्यासाठी संपत्ती, विदेशातील संपत्ती लपविणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार असून त्याबद्दल 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास तसेच संपत्तीच्या 300 पट दंड आकारण्याची तरतूद केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र दाखल न केल्यास किंवा त्याबाबत अपुरी माहिती दिल्यास 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. हा नियमाच्या आधारे बॅंका तसेच आर्थिक संस्थावरही अशा प्रकारची कारवाई करता येणार आहे. यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण ठेवता येईल, असा सरकारला विश्वास वाटतो. याबाबत जेटली म्हणाले की, गेल्या नऊ महिन्यात काळ्यापैशाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने विकासासाठी सुरु केलेल्या नव्या योजनांचाही जेटली यांनी यावेळी उल्लेख केला. एक लाखापेक्षा अधिक व्यवहारासाठी पॅन क्रमांक देणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोखीच्या व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले आहेत. |
डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा झाली. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा