कल्याण-डोंबिवलीत अवकाळी थेंबाट
शनिवारी दुपारी अचानक रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने
कल्याण-डोंबिवलीकरांची एकच पळापळ झाली . तथापि अवकाळी पडलेल्या पावसामुळे
कोठेही हानी झाल्याचे वृत्त नाही .
सकाळी दहाच्या सुमारास अचानक आकाश काळवंडले आणि हवेत गारठा पसरला
. मात्र दुपार नंतर रिमझिम पावसाला प्रारंभ झाला . अचानक पाऊस पडू
लागल्याने कल्याण-डोंबिवलीकरांची त्रेधातिरपीट उडाली . पावसाने बच्चे
कंपनीला मात्र मोहीत केले . पाऊस पडल्याने लहान मुलांनी चंगळ केली .
बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आनंद घेतला . रस्त्यावर बसणाऱ्या
फेरिवाल्यांची धांदल झाली . वयोवृद्धांनी बाहेर पडण्यासाठी बांधून
ठेवलेल्या छत्र्या बाहेर काढल्या . संध्याकाळ पर्यंत झिमझिम पाऊस सुरू
होता . त्यामुळे स्टेशनवर उतरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे वांदे झाले
. यात रिक्षावाल्यांचे नेहमी प्रमाणे चांगभलं झाले . मात्र कुठेही मोठी
दुर्घटना घडून जिवीत वा वित्त हानी झालेली नसल्याचे वृत्त आहे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा