पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारबालांसोबत नृत्य करणारे दोन पोलीस निलंबित

बारबालांसोबत नृत्य करणारे दोन पोलीस निलंबित कल्याण-शीळ फाटा मार्गावर सोनारपाडा येथील 'इंद्रप्रस्थ' बीअर बारमध्ये बारबालांसोबत नृत्य करताना अश्लील हावभाव केल्यावरून मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. संजय बाबर आणि रशीद मुलानी अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ही कारवाई केली. या दोन कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली. पाच दिवसांपूर्वी साहाय्यक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांनी सोनारपाडा येथील 'इंद्रप्रस्थ'वर छापा टाकला होता. बारमधून १७ बारबालांसह २० जणांना पोलिसांनी अटक केली होती. छाप्याच्या वेळी एक चित्रफीतही पोलिसांनी जप्त केली होती. त्यात मानपाडा पोलीस ठाण्यातील शोधकार्य विभागातील बाबर आणि मुलानी हे दोन हवालदार बारबालांसोबत अश्लील हावभाव, नृत्य करीत असल्याचे आढळून आले होते. शीळ फाटा आणि नेवाळी परिसरात महिला सेवा देणारे सुमारे ६५ हून अधिक बार आहेत. पहाटेपर्यंत या बारमध्ये धिंगाणा सुरू असतो, अशी या परिसरातील रहिवाशांची तक्रार आह

नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक

धक्कादायक घटना   नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक  डोंबिवली :-  दि. १२ ( प्रतिनिधी ) डोंबिवलीत १२ मार्च रोजी  सकाळी पूर्वेकडील फतेह अली रोडला असलेल्या एका हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून नवजात बालिकेला फेकून तिचा खून केल्याची घटना घडली  होती. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तब्बल एका महिन्यांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. दुसरी मुलगी झाली म्हणून घरी जाच होत असल्याने तिने  ५ दिवसांच्या मुलीलाएका हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून  फेकून दिल्याची कबुली दिली असल्याची माहिती वपोनी सुनील शिवलकर यांनी सांगितले. सुजाता दत्ता गायकवाड ( २४ ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे .      डोंबिवली पूर्वेत महापालीकेच्या  कार्यालयासमोरील फतेह अली रोडला शुभदा नर्सिंग होम नामक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये अंबरनाथ तालुक्याच्या नाऱ्हेण गावात राहणारी सुजाता दत्ता गायकवाड ( २४ ) या महिलेने रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सिझेरियन प्रसूती नंतर मुलीस जन्म दिला. तेव्हा पासून हि महिला आपल्या मुलीसह हॉस्पिटल मध्ये होती. गुरुवारी सकाळी अंघोळ घालून पाळण्यात ठेवलेली मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने हॉस्पिटल मध

कांगारुंची विश्वकरंडकावर पाचव्यांदा मोहोर

कांगारुंची विश्वकरंडकावर पाचव्यांदा मोहोर - दुसऱ्याच षटकात १ बाद २ अशी अवस्था झाल्यानंतरही दबावाखाली न येता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी संयमी व चतुराईने खेळी करीत १८४ धावांचे सोपे लक्ष्य ३३.१ षटकांमध्ये सहज गाठत पाचव्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले. 

'भारतरत्न' अटलजी...

इमेज
'भारतरत्न' अटलजी... नवी दिल्ली - ‘गीत नया गाता हूँ,‘ असा दुर्दम्य विश्‍वास कोट्यवधी भारतीयांच्या मनात जागविणारे अग्रणी संसदपटू व दिग्गज राजनेते, वक्ता दशसहस्रेषू, हळव्या मनाचे कवी या साऱ्या गुणांचा समुच्चय असणारे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ऊर्फ कोट्यवधी कार्यकर्त्यांचे लाडके अटलजी आज "भारततरत्न‘ बनले... राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सायंकाळी साडेपाचला वाजपेयी यांच्या 6-कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. अटलजींमुळे जणू या सन्मानाचीच उंची आणखी वाढली... पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लालकृष्ण अडवानी, मुफ्ती महंमद सईद यांच्यासह पाच मुख्यमंत्री, सरसंघचालक मोहन भागवत व सारे केंद्रीय मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना "अटलजी हे मूर्तिमंत स्टेट्‌समन आहेत व ते खऱ्या अर्थाने भारतरत्नचे मानकरी आहेत,‘ असे नमूद केले. 

सोशल मीडियाची गळचेपी संपली!

सोशल मीडियाची गळचेपी संपली! नवी दिल्ली : सोशल मीडियातून अथवा इंटरनेटवरून 'आक्षेपार्ह' मजकूर पाठविणे हा गुन्हा ठरवून त्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणारे 'इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँक्ट'चे वादग्रस्त कलम ६६ए सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घटनाबाह्य ठरवून रद्द केले. परिणामी, या कलमाच्या आधारे पोलिसी कारवाई होण्याची टांगती तलवार दूर झाल्याने सोशल मीडिया बेलगाम तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत असतानाच दुसरीकडे न्यायालयाच्या या निकालाने नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सवरेपरी मानून ते अधिक बळकट केले गेल्याने त्याचे सर्वदूर स्वागतही होत आहे.

महाराष्ट्रातील ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची आहे

  महाराष्ट्रातील ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची आहे                                                                                           मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस        महाराष्ट्रात निसर्गाने  थैमान घातले असले तरी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची आहेत .  टीका करणारे टीका करतात.मात्र प्रामाणिक  काम हाती घेतले असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची शक्ती डे अशी प्राथर्ना केली आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत स्वागतयात्रेत सांगितले.      १७ व्या नववर्ष स्वागत यात्रेच्या समारोप प्रसंगी श्री गणेश मंदिराजवळ झालेल्या समारोप समारंभात  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार  कपिल पाटील ,आमदार रवींद्र चव्हाण , सुभाष देसाई , महापौर कल्याणी पाटील , उप महापौर राहुल दामले , संस्थांचे अध्यक्ष जयकृष्ण सप्तऋषी , लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई  आदि मान्यवर उपस्थित होते. गुणवत्ता नगरी ,विचारवंतांची नागरी म्हणून डोंबिवलीचे नाव अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे

भटक्या-विमुक्त जमातींसाठी राष्ट्रीय आयोग

भटक्या-विमुक्त जमातींसाठी राष्ट्रीय आयोग  भटक्या व विमुक्त जमातींसाठी (एनसीडीएनटी) केंद्र सरकारकडून जानेवारी 2015 मध्ये एक राष्ट्रीय आयोग गठीत करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरामध्ये वरील माहिती दिली. या आयोगामध्ये काही महत्त्वाच्या विषयांचा विचार करण्यात येणार आहे. निम-भटक्या व विमुक्त जमातींशी संबंधित जातींची राज्यवार सूची तयार करण्यात येईल. अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास वर्गांतील केंद्र व राज्याच्या सूचीमधील विमुक्त आणि भटक्या जमाती निवडणे, तसेच ज्या भटक्या-विमुक्त जमातींना अद्याप अनुसूचित जाती-जमातींमध्ये अथवा इतर मागासवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले नाही अशा जाती ओळखण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या भागांमध्ये अशा भटक्या विमुक्त जमातींची संख्या अधिक आहे असे भाग निश्चित करण्याचे काम करण्यात येणार आहे. 
'आयुक्त हटाव'चा नारा! 'कडोंमपा'त गोंधळ : सेनेवर टीका करीत विरोधकांचा हल्लाबोल : सत्ताधारी शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीत विरोधकांसाठी गळचेपी धोरण सुरू असून, कल्याण-डोंबिवली महापालिका ही काय शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का? विरोधकांना सोडाच, परंतु सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजपालाही येथे विचारात घेतले जात नाही. सत्ता म्हणजे मनमानी कारभार करायचा काय, असा सवाल करून काँग्रेसचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते विश्‍वनाथ राणे यांनी राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवक-पदाधिकार्‍यांना हाताशी घेऊन शिवसेनेच्या मनमानी कारभारावर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यास साथ देणार्‍या आयुक्तांविरोधात 'आयुक्त हटाव'चा नारा त्यांनी दिल्याने शनिवारी महापालिकेच्या मुख्यालयात गोंधळासह तणावाचे वातावरण होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सत्ताधार्‍यांव्यतिरीक्त विरोधी पक्षनेते, मनसेचे गटनेते, राष्ट्रवादीचे गटनेते आदींना डावलून येथील विकास प्रकल्पांबाबत सविस्तर सहा तासांची चर्चा केली. त्या चर्चेत आयुक्तांना अनेक सूचना केल्या. दोघा अभियंत्यांवर निलंबनाचे आदेशही देण्यात
छत्रपती शिवाजी महाराज कि जय शिव जयंती  व महिला दिनाच्या हार्दिक सुभेस्च्या
बेकायदा प्रार्थनास्थळे पाडण्याचा आदेश महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील ९ सप्टेंबर २00९ नंतरची अतिक्रमण करून बांधलेली सर्व बेकायदा प्रार्थनास्थळे तत्काळ हटविण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश एका प्रकरणात सहा वर्षांपूर्वी दिलेले असताना त्याची अंमलबजावणी न झाल्याने 'सोसायटी फॉर फास्ट जस्टिस' या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर खडबडून जागे झालेल्या नगरविकास विभागाने आता अतिक्रमणे हटविण्याचे फर्मान काढले आहे. ९ सप्टेंबर २00९ नंतरची देशभरातील सर्व धार्मिक अतिक्रमणे हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच्या अंमलबजावणीचा आदेश काढण्यास राज्याच्या गृह विभागाने जवळपास दोन वर्षे घेतली. ५ मे २0११ रोजी ही अतिक्रमणे हटविण्याचा आदेश निघाला. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमण्यात येतील, असेही आदेशात म्हटले होते; पण ते सगळे कागदावरच राहिले. राज्यातील एकही बेकायदा प्रार्थनास्थळ या आदेशानुसार हटले नाही
पालिका मुख्यलयाशेजारील गुजराती शाळा बंद  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयालगत असलेल्या गुजराती शाळेचा भूखंड इमारत बांधणीसाठी ताब्यात घेत या शाळेभोवती पत्रे मारून बंदिस्त करण्यात आले आहे. याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पालिका प्रशासन सांगत असताना, महापालिकेची रीतसर परवानगी घेऊनच शाळेची जागा ताब्यात घेतल्याचा दावा विकासकाने केला आहे.  पालिकेच्या शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी कल्याण पालिका मुख्यालयालगत असलेल्या गुजराती शाळेची पटसंख्या घसरल्याचे सांगत या शाळेतील चार विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करून ही शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळेची जागा पालिकेच्या नावावर नसली, तरी १९३५पासून ती पालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे. मात्र आता या रिकाम्या झालेल्या शाळेची इमारत पाडून या जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याच्या दृष्टीने विकासकाने काम सुरू केले आहे. यामुळे शाळेची मोक्याची जागा पालिका प्रशासनाला कायमस्वरूपी गमवावी लागणार आहे.  दरम्यान, हा भूखंड विकासकाला दिल्याची माहिती नसल्याचे पालिकेचे प्रशासन अधिकारी सुरेंद्र आवारी आणि पालिका आयुक्त मधुकर

महिनाभरात डोंबिवलीतील कॉंक्रिटचे रस्ते उखडले ,

महिनाभरात डोंबिवलीतील कॉंक्रिटचे रस्ते उखडले , सत्ताधारी आणि विरोधकांत रंगला कलगीतूरा     डोंबिवली पूर्वेतील कल्याण रोड हा कॉंक्रिटचा रस्ता जागोजागी उखड़ला गेल्याचे समोर आले आहे . कल्याण रोडचे कॉंक्रिट करण्याचे काम गेल्या ८ महिन्यान पासून चालू होते . फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला . पण महिन्याभरात ह्या रस्त्याला तडे गेले आहेत . कॉंक्रिटचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले असून या वरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतूरा रंगला आहे .      कल्याण पूर्वेतील काही रस्ते तसेच डोंबिवली मधील राजाजी रोड ह्या कॉंक्रिट रस्त्यांना तडे गेल्याची घटना पुढे आली आहे . काही दिवसां पूर्वी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ह्यांनी रस्त्यांची पाहणी केली होती . राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोथान महाअभियानांतर्गत ३७६.०१ कोटी रुपये खर्च करून कॉंक्रिटचे रस्ते एकूण २३ ठिकाणी बनवण्याचे काम चालू आहे . पहिल्या टप्या मध्ये डोंबिवलीतील मानपाडा रोड , राजाजी पथ , फडके रोड व कल्याण रोड ह्या ४ रस्त्यांचे कॉंक्रिट करण्याचे

जेष्ठ कलावंतांची परिस्थिती अत्यंत हलाखीची

जेष्ठ कलावंतांची परिस्थिती अत्यंत हलाखीची                            - विसुभाऊ बापट डोंबिवली :- आज अनेक जेष्ठ कलावंतांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ताणतनावात असलेल्या असे कलावंत व्यसनाच्या आहारी गेले आहेत. जेष्ठ कलावंताना पेन्शनहि कमी आहे. अश्या कलावतांसाठी सर्व कलावंतांची संघटना काढली आहे असे सांगत आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश संयोजक ( अध्यक्ष ) विसुभाऊ बापट यांनी अनेक जेष्ठ कलावंतांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. डोंबिवलीत पतंग कवितोत्सव २०१५ च्या पारितोषिक सोहळ्यात ते बोलत होते.     भाजपा प्रभाग क्र.८९ राजाजी पथ आणि कला-सांकृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्री सभागुहात भाजपा महिला आघाडी कल्याण जिल्हा उपाध्यक्षा तथा कला- सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा निष्ठा भागवतुला यांनी आजोजित केलेल्या पतंग कवितोत्सव २०२५ च्या पारितोषिक सोहळा संप्पन झाला.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश संयोजक ( अध्यक्ष ) विसुभाऊ बापट उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, पतंगावर कविता लिहिण्याचा आणि त्या सदर करण्याची हि अप्रतिम कल्पना आहे.
संपत्ती लपविल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास नवी  दिल्ली - करचुकविण्यासाठी संपत्ती, विदेशातील संपत्ती लपविणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार असून त्याबद्दल 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास तसेच संपत्तीच्या 300 पट दंड आकारण्याची तरतूद केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल न केल्यास किंवा त्याबाबत अपुरी माहिती दिल्यास 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. हा नियमाच्या आधारे बॅंका तसेच आर्थिक संस्थावरही अशा प्रकारची कारवाई करता येणार आहे. यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण ठेवता येईल, असा सरकारला विश्‍वास वाटतो. याबाबत जेटली म्हणाले की, गेल्या नऊ महिन्यात काळ्यापैशाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने विकासासाठी सुरु केलेल्या नव्या योजनांचाही जेटली यांनी यावेळी उल्लेख केला. एक लाखापेक्षा अधिक व्यवहारासाठी पॅन क्रमांक देणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोखीच्या व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत अवकाळी थेंबाट      शनिवारी दुपारी अचानक रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने कल्याण-डोंबिवलीकरांची एकच पळापळ झाली . तथापि अवकाळी पडलेल्या पावसामुळे कोठेही हानी झाल्याचे वृत्त नाही .        सकाळी दहाच्या सुमारास अचानक आकाश काळवंडले आणि हवेत गारठा पसरला . मात्र दुपार नंतर रिमझिम पावसाला प्रारंभ झाला . अचानक पाऊस पडू लागल्याने कल्याण-डोंबिवलीकरांची त्रेधातिरपीट उडाली . पावसाने बच्चे कंपनीला मात्र मोहीत केले .  पाऊस पडल्याने लहान मुलांनी चंगळ केली . बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आनंद घेतला . रस्त्यावर बसणाऱ्या फेरिवाल्यांची धांदल झाली . वयोवृद्धांनी बाहेर पडण्यासाठी बांधून ठेवलेल्या छत्र्या बाहेर काढल्या . संध्याकाळ पर्यंत झिमझिम पाऊस सुरू होता . त्यामुळे स्टेशनवर उतरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे वांदे झाले . यात रिक्षावाल्यांचे नेहमी प्रमाणे चांगभलं झाले . मात्र कुठेही मोठी दुर्घटना घडून जिवीत वा वित्त हानी झालेली नसल्याचे वृत्त आहे .
आरक्षण रद्द झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा मुंबई - शिक्षण आणि राज्य सरकारच्या सेवेतील मागासवर्गीयांचे आरक्षण कायदा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅटने) जरी रद्द ठरविला असला तरी मॅटने या निर्णयाला एक वर्षाची स्थगिती दिलेली आहे. हा कायदा जैसे थे राहणार असल्याने कुणीही चिंता करण्याची गरज नाही. आरक्षण रद्द झाल्यास सर्वप्रथम मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मॅटच्या विरोधात दोन आठवड्यांत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी सांगितले. संविधानातील तरतुदीनुसार राज्यातील दलित, आदिवासी, भटके- विमुक्त, ओबीसी यांच्या शासकीय सेवा व शिक्षणातील आरक्षणासाठी 2004 मध्ये कायदा करण्यात आला. मात्र, मॅटने 28 नोव्हेंबर 2014 रोजी शासकीय सेवेतील पदोन्नतीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान याविरोधात निकाल दिला. मॅटने आपल्याच निर्णयाला एक वर्षाची स्थगिती दिली असली, तरी 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करणे आवश्‍यक होते; परंतु राज्य शासनाच्या पातळीवर त्याबाबत काहीही हालचाल

होळी

होळी (हुताशनी पौर्णिमा) फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. देशपरत्वे सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. या सणाचे महत्त्व, तो साजरा करण्याची पद्धत, याविषयीची माहिती या लेखातून करून घेणार आहोत. १. तिथी ‘देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ - ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. २. समानार्थी शब्द ‘उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.' ३. इतिहास अ. `पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. शेवटी
मनसे नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ७९ (गणेशमंदिर) चे मनसेचे नगरसेवक अमित सुलाखे यांना विजय पाटील या बांधकाम व्यावसायिकाने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      नगरसेवक अमित सुलाखे यांच्या प्रभागातील ठाकूरवाडी येथील राजेंद्र सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम बांधकाम व्यावसायिक विजय पाटील यांनी हाती घेतले आहे. ते काम करण्यासाठी त्यांनी जेसीबी आणि पोकलनच्या सहाय्याने तेथे  खड्डा करण्यास सुरुवात केली आहे. हे काम करत असतना शेजारीच असलेल्या गंगेश्वर सोसायटीचा येण्याजाण्यासाठीचा रस्ता संपूर्ण खचला गेल्याने येथील नागरिकांचा  मार्ग पूर्णपणे बंद झाला. गंगेश्वर सोसायटीच्या रहिवाश्यांनी याबाबत स्थानिक नगरसेवक म्हणून सुलाखे यांच्या कानावर हि बाब  घातली. नगरसेवक सुलाखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत याबाबतचा जाब बांधकाम व्यावसायिक पाटील याला विचारला. तेव्हा चिडलेल्या बांधकाम व्यावसायिक पाटील याने नगरसेवक सुलाखे यांना अरेतुरे ची भाषा करीत  तुझी मर्डर झाली तरी चालेल मी इथे काम करून दाखवेन असे म्हणून तु
सुदृढ बालक स्पर्धा २०१५  डोंबिवली :- दि. २६ ( प्रतिनिधी) डोंबिवली हेल्थ बेबीच्यावतीने पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील वैभव मंगल कार्यालयात  रविवार १ मार्च रोजी सुदृढ बालक स्पर्धा २०१५ चे आयोजन केले आहे. या  स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. हेमंत दाभोळकर, ऑ. इंद्रजीत ठाकूर  आणि परेश म्हात्रे या स्पर्धेकरिता विशेष मेहनत घेणार आहेत. या स्पर्धेत बालरोग  तज्ञ डॉ. राहुल भिरूड  आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. देवयानी भिरूड यांचे सहकार्य लाभणार आहे.

मनसेचा मराठी बाणा

  कल्याणात मनसेचा मराठी बाणा   मराठी पदवीत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर दोन वेतनवाढ दया -मनसे सचिव इरफ़ान शेख        कल्याण :- केडीएमसीतील मराठी पदवीत्तर  शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर दोन वेतन वाढ द्या अशी मागणी मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी केली आहे .मनसे याबाबत सलग तिन वर्षे पाठपुरावा करत असून  येत्या महासभेत ठराव मंजूर न केल्यास आयुक्तांना घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा दिला शेख यानि दिल आहे .                    मराठी भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन व्यवहार मराठी भाषेमध्ये करण्याचा निर्णय शासन दरबारी घेण्यात आला आहे. मात्र कल्याण डोम्बिवली  पालिकेच्या शासकीय यंत्रणेत मराठी भाषेचा वापर  तितक्या म प्रमाणात होत नसल्याचे निदर्शनास येते.  त्यामुळे पालिका कर्मचार्यांमध्ये मराठी भाषा शिकण्याची इच्छा निर्माण व्हावी या करिता मराठी विषयात पदवीत्तर  शिक्षण घेतलेल्या कामगारांना प्रोत्साहनपर दोन वेतन वाढ देण्यात यावी अशी मागनी मनसे सचिव इरफ़ान शेख यानि केलि आहे या मागणीसाठी सलग तिन वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून या निर्णयाबाबत ठाणे, मुंबई महा
  पालिका  आयुक्तंचि गाडी आणि फर्नीचर जप्त करा---कल्याण जिल्हा सत्र न्यायलयाचे आदेश          कल्याण :कल्यान नजिक असलेल्या खंबाळ पाडा येथील ख्रिश्चन समाजाच्या  स्मशान भूमि साठि आरक्षित असलेला भूखंड अतिक्रमने हटवुन लवकरात लकवर संबंधितांच्या ताब्यात दया असे   आदेश पालिका प्रशासनाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते . मात्र पालिकेकडून कार्रवाई न करण्यात आल्याने कल्याण डोम्बिवली महापालिका आयुक्तांची गाडी तसेच कार्यालयतील फर्नीचर जप्त करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायलयाचे  न्यायाधीश ए एच मार्लेचा यानी दिले आहेत .           कल्याण डोम्बिवली महापालिका विकास आराखड्यात  खम्बाळ पाडा येथील  1 हेक्टर  भूखंड ख्रिश्चन दफन भूमिसाठी राखीव करण्यात आला होता .मात्र  भूखण्डावर अतिक्रमण करन्यात आले होते .हे अतिक्रमण निष्कासित करुन सदर भूखंड ताब्यात द्यावा अशी मागणी ख्रिश्चन वेलफेयर असोशिएशन तर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती .        मात्र तब्बल वर्षभराहून अधिक कालावधि  उलटूनही कारवाई न करण्यात आल्याने ख्रिश्चन वेलफेयर असोशिएशनने कल्याण जिल्हा न्यायालयात पालिकेविरोधात दावा दाखल करत सदर जागेचा

बातमी

डोंबिवलीकरांना  येणार शिवकालीन शस्त्रे पाहण्याची संधी डोंबिवली :- दि. २४ ( प्रतिनिधी)  छत्रपती  शिवरायांपासून ते पेशव्यांपर्यतच्या  शौर्याचा धगधगता इतिहास जाणून घेण्याची व  त्या काळातील  शस्त्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळणार  आहे. हे प्रदर्शन ७ ते ८ मार्च दरम्यान पालिकेच्या  विजयनगर ,आयरे गांवा येथील लालबहाद्दुर शास्त्री शाळेत सकाळी ९ ते रात्री ९  पर्यंत राहणार  आहे.     विजयनगर उत्सव समिती गेली ३६ वर्षे सातत्याने  विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आली आहे.सध्याच्या पिढीला आपल्या इतिहासाची जाण व्हावी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारप्रेरणेस अनुसरून कर्तृत्ववान पिढी घडावी हा मुख्य हेतू असल्याचे विजयनगर उत्सव समितीचे कार्यकर्ते दत्तप्रसाद पराडकर यांनी सांगितले युद्धकाळात वापरण्यात आलेल्या मराठा, मुघल, राजपूत तलवार, मराठा धोप, पट्टा, समशेर खंडा, पदकुंत, अश्‍वकंत, गजकुंज आदि प्रकारातील भाले, मराठा कट्यार, मुघल कट्यार, हैद्राबादी कट्यार, चामड्याच्या कातडीपासून तयार केलेल्या ढाली, गुंर्ज,शमशेर, पोलादी भाला, तोफ, तोफेतील गोळे, मूठचे विविध प्रकार, कुकरी, वेगवेगळय़ा प्रकारची वाघ

मराठी भाष्या

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवलीत होणार जल्लोष  डोंबिवली :-  दि. २४ ( प्रतिनिधी )  वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिनी येत्या शुक्रवारी २७ फेब्रुवारी सर्वत्र जागतिक मराठी भाषा दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दिवशी डोंबिवलीत जल्लोष साजरा करणार आहे. यासाठी मनसेने दोन दिवस आधीच जोरदार तयारी केली आहे.       भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला पश्चिमेकडील भागशाळा तथा कान्होजी जेथे मैदानात मराठी संस्कृतीचा वारसा जोपासणारा लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत नंदेश उमप यांचा मी मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहेत. यावेळी शहरातील विविध क्षेत्रात लक्षवेधी काम करणाऱ्या ९ कर्तुत्ववान मराठी रत्नांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील नामांकित कलाकार उपस्थित राहणार आहेत.विभाग क्र. ०६ च्यावतीने उपशहराध्य तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली  विभाग  अध्यक्ष सुभाष कदम ,विभाग अध्यक्षा नीलिमा भोईर, उपविभाग अध्यक्