पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डोंबिवलीत भाजपाचा जल्लोष

इमेज
                         डोंबिवलीत   भाजपाचा   जल्लोष         डोंबिवली :- शंकर जाधव,         गुजरातमध्ये पुन्हा  २२   वर्षानंतरही   सत्ता   का यम टिकवण्यात भाजपा यशस्वी   झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद व्यक्त करीत भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशाच्या तलावर नाचत-गाजत जल्लोष साजरा केला. भाजपाच्या या जल्लोषात डोंबिवलीकरही सामील झाले.   डोंबिवली पूर्वेकडील भाजपा पूर्व मंडल कार्यालयापासून जल्लोष मिरवणूकीस प्रारंभ झाला. हिमाचल आणि गुजरात या दोन्ही राज्यात भाजपाने बाजी मारल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष तथा नगरसेवक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते बेभाम झाले होते.     नगरसेवक विश्वजित पवार, संदीप पुराणिक, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे,  खोणी ग्रामपंचायतचे सरपंच हनुमान ठोंबरे, दिनेश दुबे, महिला आघाडी अध्यक्षा उज्वला दुसाने, चौधरी-पाटील, मंडल सरचिटणीस रविसिंग ठाकूर, बाळा पवार, पवन पाटील,  प्रज्
इमेज
' स्‍वच्‍छता अॅप डाउनलोडसाठी ' पालिका प्रशासन उतरले रस्त्यावर कल्‍याण (संतोष होळकर) - स्‍वच्‍छ भारत अभियानाला अधिक चालना देण्‍याच्‍या उद्देश्‍याने स्‍वच्‍छतेसंदर्भात कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षणाअंतर्गत आजपासून विविध उपक्रम हाती घेण्‍याचे ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत जास्‍तीत जास्‍त नागरिकांकडून अॅप डाउनलोड करण्‍यासाठी महानगरपालिकेने युध्‍दपातळीवर कार्यवाही सुरु केली आहे.  स्वच्छता ऐप डाउनलोड करण्यासाठी पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी नागरी सुविधा केंद्रातील सुमारे 8 ते 10 अधिकारी व लिपिक यांना रस्त्यावर तंबू टाकून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ऍप डाउनलोड करण्यासाठी गळ घालण्याचे काम दिले होते, यासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आदी स्टेशन बाहेरही रात्री उशिरापर्यंत डाउनलोड करण्याचे काम सुरू होते, मात्र नागरिकांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसून आला नाही. शहरांतील साफसफाईची कामे योग्‍यप्रकारे केली जात आहेत किंवा कसे, यासाठी स्‍वच्‍छता अॅपवर नागरिकांनी कच-याचे फोटो पाठवावयाचे आहेत. या अॅपद्वारे प्राप्‍त झालेल्‍या तक्रारींच्‍या निपटारा जलदगतीने करण्

विद्यार्थी भारतीचे आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण...

विद्यार्थी भारतीचे आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण... नितीन आगे ला न्याय मिळावा यासाठी करणार उपोषण...      २०१४ साली अहमदनगर जिल्ह्यात खर्डा या गावी नितीन आगे ची अमानुष पाने हत्या करण्यात आली. ११ वी ला असणाऱ्या या तरुणाची एका उच्चजातीय मुलीशी जवळची मैत्री होती आणि यामुळे त्याच गावातील उच्चजातीय लोकांनी नितीन ला शाळेतून अनोळख्या ठिकाणी खेचत नेऊन त्याला मारहाण केली व त्याला जीवानिशी मारून टाकले आणि गावात झाडावर लटकवले. हे प्रकरण घडल्यानंतर अनेक पुरावे असताना देखील साक्षीदार फितूर झाले असे सांगून जिल्हा सत्र न्यायालयाने नितीन आगे ला न्याय दिलेला नाही असा आरोप विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा विजेता भोनकर यांनी केला आहे.      नितीन आगे ला ज्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे तसा न्याय दिलेला नाही. कारण घरातील लोक साक्षीदार असताना तसेच मेडिकल रिपोर्ट असताना देखील जिल्हा सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी आरोपीना सोडून दिले आणि आज ते आरोपी मोकाट आणि जातीचा माज घेऊन गावात फिरत आहेत अशी माहिती विद्यार्थी भारती कार्याध्यक्षा स्मिता साळुंखे यांनी दिली आहे.       २०१४ देखील जेव्हा हे हत्याकां

आरटीई अंतर्गत सण 2018 चे एडमिशन थांबवावे लागतील - शाळांच्या संघटनेचा इशारा

  आरटीई अंतर्गत सण 2018 चे एडमिशन थांबवावे लागतील  -  शाळांच्या संघटनेचा इशारा         कल्याण : सरकारने शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून राईट टू एज्युकेशन हा चांगला कायदा अस्तित्वात आणला .या कायद्या अंतर्गत गरजू गरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव करण्यात आल्या या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारकडून केला जाणार होता .मात्र तब्बल पाच वर्षे उलटूनही सरकार कडून खाजगी शाळांना अद्याप परतावा मिळाला नसल्याने शाळा व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली आहे .तसेच तब्बल पाच वर्षे शासनाकडे पाठपुरावा करून ,आंदोलने,पत्रव्यवहार, मंत्र्यांसोबत बैठक घेऊनही एक छदाम ही न मिळल्याने 31 डिसेंम्बर पर्यंत परतावा करावा अन्यथा नाईलाजाने खाजगी शाळांवर आरटीई अंतर्गत एडमिशन थांबवावे लागतील असा इशारा दिला,         सरकारने कोणताही विध्यार्थी शिक्षनापासून वंचीत राहू नये गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरटीई कायदा अस्तितावत आणून त्याची अंमलबजावणी सुरू केली .मागील 5 वर्षांपासून  या शाळांना गरीब विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा आरटीइ अंतर्गत राखीव ठेवण्याचे बंधन

परिवहन कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम नाही,

परिवहन कर्मचाऱ्यांना  मेडिक्लेम नाही,    कल्याण,/      कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे  ६१५ कर्मचारी गेल्या अनेक  वर्षापासून मेडिक्लेमची मागणी  करत आहे.  मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने    परिवहन समितीचे  सदस्य  संतोष चव्हाण यांनी  नाराजी व्यक्त  केली आहे. एखादा कर्मचारी आजारी पडल्यास त्याचा  रुग्णालयातील खर्च ऊचलण्यासाठी परिवहन कर्मचारी  प्रत्येकी १०० रुपये काढून हॉस्पिटलचे बिल भारतात . २०१२  साली परिवहन समितीच्या सभेत  परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना  मेडिक्लेम देण्याचा ठराव मंजूर  करण्यात आला होता. शुक्रवारी परिवहन समिती सभापती आणि सदस्यांनी डोंबिवली येथील परिवहन सेवेच्या तुटक्या केबिनची पाहणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मेडिक्लेमची मागणी केली.   सदस्य संतोष चव्हाण यांचा पाठपुरावा याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला आहे.            डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील जागा डोंबिवलीतील  परिवहन कर्मचाऱ्यांना कामासाठी मिळावी म्हणून परिवहन समिती सभापती संजय पावशे  सदस्य संजय राणे  आणि संतोष चव्हाण यांनी पाहणी केली. त्यानंतर इंदिरा चौकात

आमदार अप्पा शिंदे यांची पुन्हा अध्यक्ष पदी निवड

आमदार अप्पा शिंदे यांची पुन्हा अध्यक्ष पदी निवड कल्याण/   अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आग्रा (उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या  त्रैवार्षिक निवडणुकित आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालिल जे.एस.एस.पैनलचा पुन्हा एकदा दणदणीत विजय. मा. आमदार श्री.आप्पासाहेब  शिंदे (महाराष्ट्र)  अध्यक्ष, मा.श्री. राजीवजी सिंगल (मध्यप्रदेश) सेक्रेटरी, मा.श्री.के.के.सेल्वन (तामिळनाडू)  खजिनदार. या पदावर निवडून आले त्या बदल अप्पा शिंदे यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे,          अप्पा शिंदे यांची गेल्या महिन्यातच महाराष्ट्र केमिष्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही निवड करण्यात आली आहे,

कोरियन शिष्‍ठमंडळाची कल्‍याण डोंबिवली महापालिकेस भेट

कोरियन शिष्‍ठमंडळाची कल्‍याण डोंबिवली महापालिकेस भेट कल्याण/ कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अडीचशे हेक्टरवरील प्रस्तावित टाउनशिप प्रकल्पासाठी अर्थ सहाय्य करण्यासाठी दक्षिण कोरियाची लॅन्ड अॅन्ड हाउसिंग कंपनी तयार झाली आहे. कंपनीचे अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पार्क सँग वू यांच्या नेतृत्वाखालील कोरियन शिष्टमंडळाने आज पालिका मुख्यालयात महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त पी वेलारसू तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी वाडेघर परिसरातील प्रस्तावित जागेचीही पाहणी केली. पाहणी करताना आधारवाडी डम्पिंग ग्राउंड पाहून कोरियन शिष्टमंडळाने आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते,         2015 मधे झालेल्या सामंजस्य करारानुसार दक्षिण कोरिया भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या अंतर्गत त्यांनी कडोमपाच्या टाउनशिपच्या प्रस्तावित प्रकल्पाची निवड केली आहे. दक्षिण कोरियाची लॅन्ड अॅन्ड हाउसिंग या सरकारी कंपनीचे कार्यकारी अधिकारी तसेच अध्यक्ष पार्क सँग वू यांच्यासह कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे संचालक ली जिआँग वूक, मुख्य सल्लागार ली कि येओल, भारतीय स्मा

डोंबिवलीत कोकण संस्कृतीचे दर्शन...

डोंबिवलीत कोकण संस्कृतीचे दर्शन...                 - खासदार  डॉ. श्रीकांत शिंदे    कल्याण ,    डोंबिवलीत  कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या महोत्सवाला गर्दी वाढत आहे. खरं तर आयोजकांचे अभिनंदन केले पाहिजे . कारण डोंबिवलीकरांना  कोकण संस्कृतीचे दर्शन घडवले जात आहे, असे  प्रतिपादन  कल्याण लोकसभा मतदार संघाचे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महोत्सवाला भेट दिल्यानंतर केले,      रविवार १९ तारखेपर्यत डोंबिवली पूर्वेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथे कोकण महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाचे आयोजन कोकण एकता  प्रतिष्ठानचे भाई   पानवडीकर यांनी केले आहे.   या महोत्सवात महिलांसाठी ` भोंडला`, लहान मुलांसाठी  मॅजिक शो, मोफत भेटवस्तू , श्री देवी भगवती दशावतार नाट्यमंडळ ( मुणगे , देवगड ) नृत्य अविष्कार , लावणी महाराष्ट्राची , महाराष्ट्रातील पहिली महिला सांबल वादक सुलभा सावंत संचालित लोकसंगीताचा जागर आणि देवीचा पारंपरिक गोंधळ असे कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवात प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम , कुशल बद्रिके , अभिनेता स्वप्नील जोशी , शनया  , सुकन्या काळण , प्रिया शेलार , क्र

नागरिकांसाठी पदपथ मोकळे करा

नागरिकांसाठी पदपथ मोकळे करा. !  आयुक्‍त पी. वेलरासू कल्‍याण  - महापालिका हद्दीतील पदपथ नागरिकांसाठी मोकळे करा,असे आदेश महापालिका आयुक्‍त पी. वेलरासू यांनी प्रभाग क्षेञ अधिका-यांना दिले.सोमवारच्या साप्‍ताहिक आढावा बैठकीत आयुक्‍तांनी आज विविध कामांचा आढावा घेतला.फेरीवाल्‍यां संदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे कारवाई करीत असल्‍याने, आयुक्‍तांनी त्‍यांचे कौतुक केले.नागरिकांना चालणे-फिरणे सोपे जाण्‍याच्‍या दृष्‍टीने रस्‍त्‍यालगत असलेला पदपथ  मोकळे करण्‍याचे आदेश आयुक्‍तांनी दिले. ज्‍या दुकानदारांनी अथवा गाळेधारकांनी पदपथ काबीज केले आहेत, अशांनी स्‍वतःहून केलेली अतिक्रमणे त्‍वरीत काढून घ्‍यावेत. अन्‍यथा दुकानदार अथवा गाळेधारकांनी (पदपथावर) केलेली अतिक्रमणे महापालिकेने काढल्‍यास, त्‍याचे शुल्‍क संबधित व्‍यावसायिकाकडून वसूल केले जाईल, याची खबरदारी घ्‍यावी,असा इशारा आयुक्‍तांनी दिली. याशिवाय महापालिकेकडे हस्‍तांतरित झालेले वा आरक्षित असलेले भूखंड मोकळे करण्‍यात यावेत असे निर्देश देवून, नगररचना विभागाने अशा भुखंडांची सविस्‍तर माहिती

नोटबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक

नोटबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक कल्याण / संपूर्ण देशाला ढवळून काढणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे कल्याणात 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा सामान्य जनतेलाच प्रचंड तोटा झाल्याचे सांगत त्यामूळे १२० जणांना नाहक जीव गमवावा लागला. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे येत्या बुधवारी 'ब्लॅक आऊट डे' आंदोलनाची हाक देण्यात आल्याची माहिती सुहास कोते यांनी  दिली. या आंदोलनांतर्गत येत्या ८ तारखेला रात्री ८ वाजता आपापल्या घरातील आणि परिसरातील दिवे (लाईट) अर्धा तास बंद ठेऊन नोटबंदीचा निषेध केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या, बँकेसमोरील रांगेत देशाच्या झालेल्या लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या या तुघलकी निर्णयाविरो

जागतिक रंगभूमीदिनी पत्रकार शंकर जाधव यांचा सत्कार

जागतिक रंगभूमीदिनी  पत्रकार शंकर जाधव यांचा  सत्कार डोंबिवली :- ( प्रतिनिधी )  जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद डाेंबीवली शाखेच्या वतीने  आनंद बालभवन येथे  पार  पडलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार सोहळ्यात  महापौर राजेंद्र देवळेकर यांनी नाट्यकर्मिंच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.   कार्यक्रमात नृत्य या संस्थेच्या स्वप्ना कुंभार देशपांडे आणि  ३० नृत्य कलाकार यांनी नांदी ,शिव वंदना, लावणी ,लावणी पाश्चात्य ठेका,गरबा,भोंडला आणि इतर नृत्य प्रकार  सादर केले.प्रा डॉ प्रसाद भिड़े तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे ह्यांनी वि. वा. शिरवाडकर - कवी मनाचा नाटककार हा सुंदर कार्यक्रम सादर केला. विनोदी विडंनात्मक संस्कृत नाट्य कदौघ ( संदर्भ कट्यार काळजात घुसली ) लेखक दिग्दर्शक सादरकर्ते युवराज ताम्हणकर आणि सहकारी यानी सादर केले.यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर आणि सभागृह  नेते राजेश मोरे  यांच्या हस्ते सु. श्री. इनामदार, भालचंद्र कोल्हटकर , सुरेश सरदेसाई , रमेश भिडे , विवेक जोशी आणि डॉ. संजय रणदिवे अश्या सहा ज्येष्ठ रंगकर्मीचा तसेच रंगभूमि संबंधी समस्या

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे मंत्री काम करत आहेत: रविंद्र चव्हाण

इमेज
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे मंत्री काम करत आहेत: रविंद्र चव्हाण कल्याण : लोकसभा निवडणूकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत  अष्टप्रधान मंडळाची चर्चा होती तशाच पद्धतीनें केंद्र व राज्यातील भाजपचे मंत्री लोकहिताचे काम करत असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वमधील एका कार्यक्रमात केले. भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील आयोजित कल्याण पूर्व मधील नूतन ज्ञानमंदीर शाळेत दोन दिवसीय शिवकालीन शस्रास्रे प्रदर्शन आयोजित केले असून त्याचे उदघाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रदर्शन आयोजक संजय मोरे, संतोष पाटील तसेच शस्र संग्रहित करणारे सुनील कदम यांचे कौतुक करत आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की शस्त्र प्रदर्शन पाहून आनंद झाला, यातून एकच सिद्ध होते की शिवाजी महाराज यांनी केलेली प्रत्येक लढाई महत्त्वपूर्ण होती आणि वेळेनुसार त्यांनी आणि त्यांच्या माव

निधी नसताना प्रभागात 30 लाखाची कामे

महापालिकेत निधी उपलब्ध नसताना प्रभागात ३० लाखाची विकास कामे कल्याण / कल्याण डोंबिवली महापालिकेत निधीची चणचण जाणवत आहे. असे असताना मात्र प्रभाग क्रमांक ४३ मेट्रो मॉल , गावदेवी  येथे ३० लाखाची विकास कामे सुरू करण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथील स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनी आमदार निधीतून हा फंड मिळवला असून येथिल नागरिकांच्या मागणी नुसार गटार व पायवाटाचे कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक ४३ मध्ये गोसावी पुरा, सबरजित चाळ हा दाटीवाटी चा भाग आहे . येथील नागरिकांची येथे गटारे व पायवाटा बनविण्याची अनेक दिवसाची मागणी होती. या बाबत स्थानीक नगरसेवक नवीन गवळी या साठी महापालिकेकडे सतत पाठपुरावा करीत होते. पण महापालीके कडून निधी उपलब्ध नसल्याने ही कामे होत नव्हती. ही प्रभागातील कामे होत नसल्याने या बाबतचा तगादा नागरिकांनी नगरसेवक नवीन गवळी यांच्या कडे लावला असता त्यांनी या बाबत आमदार निधीतून हा ३० लाखाचा निधी मिळवला. या गटारे व पायवाटाच्या कामाचे भूमिपूजन स्वताच्या हस्ते न करता त्यांनी हा भूमीपूजनाचा मान स्थायिक नागरिकांना देऊन

मच्छी बाजाराने नागरिक त्रस्थ

इमेज
फुटपाथ वरील मच्छी बाजाराने नागरिक त्रस्थ कल्याण / कल्याण स्टेशन जवळील एसटी बस स्थानका जवळ भरत असलेल्या अनाधिकृत मच्छी बाजाराने बस स्थानकातील प्रवासी व फुटपाथ वर चालणारे नागरी त्रस्थ झाले आहेत. या अनधिकृत भरणाऱ्या मच्छी बाजाराने बसच्या प्रवाश्याना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.तर नागरिकांना या मच्छी विक्रेत्या मुळे चालायला त्रास होत असून मच्छीची घाण पसरल्याने नागरिकांना नाक मुठीत घेऊन चालावे लागत आहे.     या   त्रासा बद्दल येथील नागरिकांनी स्थानिक भाजपा नगरसेवक सचिन खेमा यांना तक्रार केल्याने त्यांनी या बाबत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला पत्र दिले असून या अनधिकृत मच्छी बाजारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर हा मच्छी बाजार उठविण्यात आला नाही तर आपण या अनाधिकृत मच्छी बाजाराच्या विरोधात महासभेत आवाज उठवू असे या बाबत नगरसेवक सचिन खेमा यांनी बोलताना सांगितले.

फेरीवाला हटाव पथक हप्ता घेऊनही करतात कारवाई

  फेरीवाला हटाव पथक  हप्ता घेऊनही  करतात कारवाई     भाऊ पाटील यांचा आरोप डोंबिवली :- मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यावर पालिका प्रशासनाने  स्टेशन परिसरातील  फेरीवाल्यांना  हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र फेरीवाला संघटनेने यावर आपली भूमिका मांडण्यासाठी मंगळवारी डोंबिवलीत घेतलेल्या भव्य मेळाव्यात पालिकेच्या फेरीवाला हटाव पथक  हप्ता घेऊनही कारवाई केली जाते असा आरोप शिवगर्जना फळ-भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भाऊ पाटील यांनी केला.         कष्टकरी  हॉकर्स  व भाजी विक्रेता युनियनच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील शुभमंगल कार्यालयात फेरीवाल्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कष्टकरी  हॉकर्स  युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे , सल्लागार प्रशांत सरखोत , शिवगर्जना फळ-भाजी विक्रेता संघटनेने अध्यक्ष भाऊ पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाऊ पाटील म्हणाले , फेरीवाला हटाव पथकातील अधिकारी संजय कुमावत हे अनेक वर्ष याच पदावर का आहेत ? फेरीवाल्यांकडून पालिकेने जप्त  केलेला माल नक्की कुठे जातो याचे उत्तर द्यावे . फेरीवाला पथकातील कर्मचारी फेरीवाल्यांकडून हप्ता घ

भोपर ते कोपर दिवे न लावल्यास `भीक मागो ` आंदोलन

इमेज
भोपर   ते कोपर दिवे न लावल्यास   `भीक मागो ` आंदोलन                 भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचा इशारा     डोंबिवली :-   भोपर गाव ते कोपर रेल्वे स्थानकापर्यत पथदिवे नसल्याने या रस्त्यावर  अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. म्हणून  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठान आणि येथील चाळकऱ्यानी  स्वखर्चाने  या रस्त्यावर एलएडीचे दिवे लावले होते. आता हे दिवे बंद पडले असल्याने आता  हि जबाबदारी पालिकेचे असल्याने या रस्त्यावर पथदिवे लावावीत अशी मागणी भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानने केली आहे. मात्र निधी अभावी हे काम रखडणार असेल तर आम्ही भीक मागो आंदोलन करू असा इशारा  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे  पदाधिकारी गजानन पाटील यांनी  दिला आहे.    भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि शिवसेना तालुकाप्रमुख  एकनाथ पाटील यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात विद्युत विभागाचे प्रमुख उपअभियंता राजेंद्र कुऱ्हेकर यांची भेट घेतली. भोपर गाव ते कोपर रेल्वे स्थानकापर्यत पथदिवे नसल्याने भोपर गावातील नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी चालणे मुश्किल झाले  आहे. भोपरकर सामाजिक प्र

भोपर ते कोपर पथदिवे न लावल्यास `भीक मागो ` आंदोलन

भोपर  ते कोपर पथदिवे न लावल्यास   `भीक मागो ` आंदोलन         डोंबिवली :-  भोपर गाव ते कोपर रेल्वे स्थानकापर्यत पथदिवे नसल्याने या रस्त्यावर  अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. म्हणून  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठान आणि येथील चाळकऱ्यानी   स्वखर्चाने  या रस्त्यावर एलएडीचे दिवे लावले होते. आता हे दिवे बंद पडले असल्याने आता  हि जबाबदारी पालिकेची असल्याने या रस्त्यावर पथदिवे लावावीत अशी मागणी भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानने केली आहे. मात्र निधी अभावी हे काम रखडणार असेल तर आम्ही भीक मागो आंदोलन करू असा इशारा  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे  पदाधिकारी गजानन पाटील यांनी  दिला आहे.

बसचा वापर फुगे विकण्यासाठी

इमेज
फेरीवाल्याचा बंद पडलेल्या बसला फुगे लावून व्यवसाय.  कल्याण :कल्याण डोंबिवली परिवाहनच्या मुख्य डेपोच्या बाहेर बंद पडलेल्या केडीएमटी बसचा आसरा घेत फेरीवाल्यांने व्यवसाय सुरू करत जणू काही 'फुग्यासह केडीएमटी बस विकणे आहे' असे केडीएमटी प्रशासनाची खिल्ली उडवली आहे. यामुळे केडीएमटी प्रशासनाचा ढिसाळ कारभार चर्चेचा विषय ठरला आहे.     पालिका परिवहन विभागाच्या ताफ्यात 218 बसेस आहेत पैकी 81 बसेस रस्त्यावर धावत असून त्यातील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे केडीएमटी डबघाईला येत असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे खासगी ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्याने कल्याण पश्चिम परिसरात खराब झालेल्या बसेस गणेश घाट डेपोच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असल्याने केडीएमटीला घरघर आल्याचे समोर आले आहे. कल्याण पश्चिममधील केडीएमटी गणेश घाट बाहेर बंद पडलेल्या बसेस उभ्या आहेत. त्याचा आसरा घेऊन फुगे विकत आहे. त्याने चक्क बंद पडलेल्या बसेसला फुगे लावले असून जणू काही केडीएमटी बस विक्री करणे आहे. असे चित्र समोर आल्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन होत असून केडीएमटी प्रशासन बसेस ची सुरक्षा प

मोहने येथे बगीचा आणि अवकाश केंद्राची मागणी

इमेज
मोहने येथे बगीचा आणि अवकाश केंद्राची मागणी           कल्याण : कल्याण जवळ असलेल्या मोहने येथील  पंप हाऊस च्या जागेवर बगीचा व अवकाश केंद्र उभारावे अशी मागणी अ प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. यासाठी नगरसेवक निधी देण्याची तयारी दाखवून उर्वरित निधी पालिका प्रशासनाने तरतूद करत नागरिकासाठी मनोरंजण व शैक्षणिक केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचे निवेदन पत्र कोट यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.         महापालिकेचे मोहने पंप हाऊस बंद होण्याच्या मार्गावर असल्याने या ठिकाणी मोकळ्या होणाऱ्या जागेवर नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी,खगोलप्रेमींसाठी, पक्षी निरीक्षक प्रेमींसाठी अद्यावत बगीचा व अवकाश दर्शन दुर्बीण,महापालिका प्रोजेक्ट मॉडेलचे दर्शन, उल्हासनदी किनारी उतरण्यासाठी घाट आदी सुविधा करत शैक्षणिक व मनोरंजन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव  मनसेच्या अ प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट यांनी प्रशासनाला सादर केला आहे. तसेच या कामासाठी नगरसेवक निधीतून पाच लाख रुपये देण्याची तयारी कोट यांनी दर्शवत अतिरिक्त निधीची तरतूद प्रशासनाने करून सदर मनोरंजन व

डोंबिवली स्टेशन जवळून केडीएमटी बससेवा सुरु

इमेज
                     डोंबिवली स्टेशन जवळून केडीएमटी बससेवा सुरु कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकपरिसरमधून केडीएमटी बस सोडून केडीएमटी परिवहन समिती सदश्यांनी अनोखी भेट दिली.  मंगळवार सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला, यावेळी परिवहन विभागाला चांगले दिवस यावे यासाठी सभापती संजय पावशे यांनी साकडे घातले यावेळी उपस्थितांनी होय महाराजा म्हणत साथ दिली. डोंबिवली पूर्व  रेल्वे स्थानक परिसर मधून केडीएमटी बसेस सोडाव्या अशी मागणी होती त्याला अखेर आज मुहूर्त मिळाला. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते लोढा हेवन व्हाया निळजे रेल्वे स्थानक, दुपार सत्र डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते मानपाड़ा, पी एंड टी कॉलनी,  ग्रोगासवाडी या बसेस पूर्वी बाजी प्रभु चौकातुन सूटत असत.  सभापती संजय पावशे, स्थानिक नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेता मंदार हळबे, महाव्यस्थापक देवीदास टेकाळे, वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोंविद गंभीरे, प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, अमित पंडित, परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण, राजेंद्र दीक्षित, सुभाष म्हस्के, प्रल्हाद म्हात्रे, मनोज चौधरी, संजय राणे, मधुकर यशवं
इमेज
उभार्णी ते श्री क्षेत्र टिटवाळा महागणपती पायी दिंडीचे टिटवाळ्यात स्वागत कल्याण : श्रावणी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून पंचक्रोशितील बल्याणी, उंभार्णी ग्रामस्थाच्या वतीने   सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र टिटवाळा महागणपती पायी दिंडी सोहळा संपन्न झाला. टिटवाळ्या मध्ये या पायी दिंडीचे स्वागत स्थायी समिती सदस्य नगरसेविका उपेक्षा शक्तीवान भोईर यांनी केले. याप्रसंगी दिंडीतील वारकरी  व भाविकांना खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले. समाजसेवक शक्तीवान भोईर आणि स्थायी समिती सदस्य उपेक्षा भोईर यांनी पायी चालत या दिंडीत सहभाग घेतला. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोईर, यामिनी चव्हाण, कल्पना रोंबेकर, राजश्री चव्हाण, प्रभा नरसिहन, साई भोईर, विनोद, किरण, नेहा चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.