पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रभाग अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर 25 हजारांची लाच घेताना अटक

प्रभाग अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर 25 हजारांची उंबरठ्यावर 25 घेताना अटक   लाच खोर सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांना कारवाई कल्याण (प्रतिनिधी ) : कल्याण डोंबवली महानगर पालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरत्या वर्षी पुन्हा एकदा पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला असून, आय प्रभाग अधिकारी शरद पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला, अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पहिला हप्ता 25 हजरांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक केली आहे, पालिकेच्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत एकूण 34 अधिकारी कर्मचार्यांसह नगरसेवक ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागलें आहेत . सापळ्यात अडकलेले शरद पाटील हे  तीन महिन्यांनी मार्च महिन्यात सेवा निवृत्त होणार होते, त्यांनी या प्रकरणामुळे आपल्या सर्व कामाईची वाट लावली अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे,       कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला भ्रष्टाचाराणे पोखरले असल्याने लाचखोरीला उधाण आले आहे .पालिकेत गेल्या अनेक वर्षात दोन डझनाहून अधिक अधिकारी व कर्मचार्यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटका करूनही लाचखोरीची चटक अद्याप

किल्ले स्पर्धा प्रत्येक शाळेने भरवाव्यात: आमदार पवार

इमेज
किल्ले स्पर्धा प्रत्येक शाळेने भरवाव्यात: आमदार पवार कल्याण( प्रतिनिधी ):- किल्ले स्पर्धा शाळेत घेणे हा चांगला उपक्रम असून प्रत्येक शाळेत अश्या स्पर्धा झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमाची माहिती मिळेल अश्या स्पर्धा फक्त मराठी शाळेतूनच होऊ शकतात, किल्ले स्पर्धा आयोजित केल्याने मुलाना किल्ल्यांची माहिती होते व आपला इतिहास विद्यार्थ्यांना समजतो, इंग्लिश मिडियमच्या शाळेतून शिवाजी महाराजांच्या इतिहास गायब झाले असून महाराष्ट्रात असे होणे योग्य नसल्याचे मत आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले, अटाळी येथील गजानन हिरू पाटील विद्यालयातील 1 पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 74 विविध किल्ले बनविले होते त्याचा प्रदर्शनाच्या उदघाटन समई आमदार नरेंद्र पवार बोलत होते, या वेळी आमदार पवार यांनी आपण स्वतः सुमारे 30 किल्ले पाहून झाले असून सर्व विद्यार्थ्यांनी महाराजांच्या 1 तरी किल्यावर एकदातरी जाऊन या असे आवाहन करून विध्यार्थ्यांनी  चांगल्या प्रकारे किल्ले बनविले बद्दल त्यांचे कौतुक केले, या वेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील, जनार्धन पाटील, माध

महिलांनी फक्त प्रशिक्षण न घेता आर्थिक सक्षम व्हावे:- आमदार नरेंद्र पवार

इमेज
महिलांनी फक्त प्रशिक्षण न घेता आर्थिक सक्षम व्हावे:- आमदार नरेंद्र पवार कल्याण( प्रतिनिधी ):- महिलांनी फक्त प्रशिक्षनासाठी उपस्थित न राहता या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या माहितीचा योग्य तो उपयोग करून आपला रोजगार व रोजीरोटी कमविण्यासाठी त्याचा उपयोग करावा त्या साठी लागणारी सर्व प्रकारची मदत भारतीय जनता पक्षतुन आम्ही नेहमीच करत राहू मात्र महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार नरेंद्र पवार यांनी केले, भाजप महिला आघाडी व भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड मार्फत अटाळी येथील गजानन हिरू पाटील विद्यालयात झालेल्या दोन दिवसीय महिला सक्षमीकरण शिबिराचे उदघाटन प्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले, यावेळी उपमहापौर उपेक्षा भोईर, मोहने मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील सर, माजी परिवहन सभापती रमेश कोणकर, मुख्याध्यापिका मीनल पाटील मॅडम, आगरी कवी ग्राहक अधिकारी गजानन पाटील, प्रादेशिक संचालक अभिजित चावक, कामगार शिक्षक चंद्रकांत खोत, नागेश पाटील, निर्मला पवार, सुचिता होळकर आदी मान्यवर उपस्थित होते, दोन दिवसीय महिला सक्षमीकरण शिबिरातील

वन जमिनीवरील शेकडो बांधकामे जमीनदोस्त

इमेज
वन जमिनीवरील शेकडो बांधकामे जमीनदोस्त लाठीचार्ज करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी           कल्याण(प्रतिनिधी) :- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील उंभार्ली गावलीतील वनजमिनिवरील अतिक्रमण केलेल्या शेकडो खोल्यांचे अनधिकृत बांधकामे आज वन विभागाने दहशत माजवत जमीन दोस्त केले, वन विभागाची ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते,             महाराष्ट् सर्वच ठिकाणी वनजमिनिवर मोठया प्रमाणावर भूमाफियांनी  अतिक्रमण केले असून वनविभागाची आजची कार्यवाही म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार असल्याचे दिसून आले, लाखो रुपये कमविणार्या भूमाफियांवर ही कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे, असे केल्यावरच अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होणार नाहीत,           कल्याण जवळील उंभार्ली गावात काही भूमाफियांनी गेल्या 5 ते 6 वर्षा पासून वनजमिनिवर अतिक्रमण करत सुमारे 300 खोल्या बनविल्या आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून बनत असलेले अनधिकृत बांधकामे पालिका, पोलीस, वन विभाग लोकप्रतिनिधी यांच्या डोळ्यादेखत सुरू असताना या पुर्वी कोणीही या अनधिकृत बांधकाम कामास व

20 लाख खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतातील पहिल्या स्पर्धा - देवेंद्र फडणवीस

इमेज
20 लाख खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतातील पहिल्या स्पर्धा - देवेंद्र फडणवीस            कल्याण(प्रतिनिधी ):- महाराष्ट्र भर 20 क्रीडा व 5 सांस्कृतिक प्रकारच्या सीएम चषक सुरू असून या मध्ये 20 लाख खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या सीएम चषक स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून या स्पर्धांच्या खेळाडूंची नोंदणी 50 लाखावर जाईल असा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.             मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याण जवळील मोहने येथे एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फूटबॉल अंतिम सामन्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी त्यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.प्रारंभी आयोजक आमदार नरेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व मराठवाड्यात सहा ठिकाणी आपण जलयुक्त शिवारची कामे सुरू केल्याची माहिती दिली.             हारजीत महत्वाची नाही, संघभावनेतून केलेला खेळ महत्वाचा आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, खेळामुळे जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते, सांघिक भावना वाढीला लागते. स्वामी विवेकानं

महिलांंच्या बचत गट मेळाव्यात डिजिटल बॅॅकिंगचे मार्गदर्शन

इमेज
महिलांंच्या बचत गट  मेळाव्यात डिजिटल बॅॅकिंगचे मार्गदर्शन             कल्याण ( प्रतीनिधी ) :- भाजप नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील एव्हरेस्ट सभागृहात महिला बचत गटासाठी २१ आणि २२ नोव्हेंबर असे दोन दिवस रोजगार मार्गदर्शन शिबीर सुरु झाले आहे.मेळाव्यात रोजगाराची माहिती मिळावी म्हणून महिलांनी गर्दी केली. या शिबिरात दोन दिवस उपस्थिती लावणाऱ्या महिलांना 400 रुपये उपस्थिती भत्ता देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले,           यावेळी केंद्रीय कामगार शिक्षण बोर्डाचे कामगार अधिकारी अभिजित चावक, ग्राहक संरक्षण विभाग ( मुंबई ) प्रकल्प अधिकारी गजानन पाटील, शिक्षण अधिकारी एम.आर.जरिया,अनुलोमचे उपविभागप्रमुख संतोष साळुंखे आणि निवेदिता जोशी, नमिता कौर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरसेविका मनीषा धात्रक म्हणाल्या, प्रभागातील महिलांसाठी विविध संस्कृतीक उपक्रम आयोजित करत असतो.ज्यामुळे आमच्या प्रभागातील महिलांना लाभ व्हावा म्हणून सरकारच्या वतीने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना आल्या आहेत. याची प्रभागातील माहिती सामान्य महिलांना मिळावी य

डोंबिवलीतील भावे सभागृहाच्या नुतनीकरनाचा तिढा सुटेना

डोंबिवलीतील भावे सभागृहाच्या नुतनीकरनाचा तिढा  सुटेना           कल्याण ( प्रतिनिधी ) :-   डोंबिवली पश्चिमेकडील  पु,भा.भावे सांस्कृतिक सभागृहाची उभारण्यात आलेली इमारत धोकादायक झाली आहे. गेली अनेक वर्षा पासून इमारतीच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी भाजपाचे स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांच्या सह सर्वच राजकिय पक्षानी पालीका प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला होता. पालिका प्रशासनाकडून या इमारतीच्या नुतनिकरनासाठी दरवषी पालिकेच्या अर्थसंकल्पात लाखो रुपयाची कागदो पत्री तरतूद केली जाते  मात्र सदर वास्तूची जागा कलेक्टर लेन्ड असल्याने या इमारतीच्या जागेचा भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव  जिल्हाधिकारी कार्यालयात गेली अनेक महिने धुळ खात पडून आहे .त्यामुळे पु,भा भावे सांस्कृतिक भवन इमारतीच्या नुतनीकरनाला तिढा सुटणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे .           डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोड येथील साहित्यिक पु.भा.भावे सभागृह यांच्या नावाने पु,भा.भावे सांस्कृतिक सभागृहाची इमारत उभारण्यात आली .या दोन मजली इमारतीत तळमजल्यावर सभागृह असून त्या ठिक

विवाहमैत्री डाँट काँम मुळे संस्था आणि वधुवरांचा पैसा व वेळ वाचेल..... शरद वाडेकर.

इमेज
विवाहमैत्री डाँट काँम मुळे संस्था आणि वधुवरांचा पैसा व वेळ वाचेल.....  शरद वाडेकर.              कल्याण ( प्रतिनिधी ) :  डोंबिवली पूर्व येथील कल्याण डोंबिवली महानगरपालीका कार्यालयातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विवाहमैत्री डाँट काँम( www.vivahmaitry.com) आणि सिंधुदूर्ग कुंभार समाज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  वधुवर मेळावा पार पडला. विवाहमैत्री डाँट काँम हे संकेतस्थळ अलिकडेच सुरु केल्यापासुनचा हा पहिलाच मेळावा आहे. मेळाव्याचा शुभारंभ संतशिरोमणी  श्री गोरोबाकाका यांच्या मुर्तीचे पूजन व दिपप्रज्वलन श्री शरद वाडेकर यांच्या हस्ते करुन झाला.             नविन पिढी चोखंदळ आणि टेक सँव्ही असल्याने समाजाच्या वधुवर मेळाव्यांना आधुनिक तंत्रद्न्यानाची जोड देण्याची गरज आहे, त्याची पूर्तता विवाहमैत्री डाँट काँम या हायटेक प्लँटफाँर्ममुळे झाली आहे, त्याचा समाजसंस्थांनी लाभ उठवला पाहिजे. वर्षाला फक्त तीनशे रुपये इतक्या किफायतशीर दरात ही सेवा उपलब्ध आहे. वर्षभर रजिस्ट्रेशनची सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक संस्थेने वेगवेगळे वधुवर मेळावे लावण्यापेक्षा जवळपासच्या चारपाच संस्थां

डेब्रिज हटविल्याने अखेर नागरिकांना मिळाला रस्ता,

डेब्रिज हटविल्याने अखेर नागरिकांना मिळाला रस्ता, नागरिकांसह  नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश        कल्याण( प्रतिनिधी ) : जमिनीच्या मालकी हक्कच्या वादामुळे कल्याण पूर्वेतील दुर्गामाता सदन या इमारतीसह आसपासच्या इमारतीना जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात  कचरा आणि डेब्रिज टाकले जाते यामुळे नागरिकांना हा कचरा व डेब्रिज तुडवत घर गाठावे लागत होते,          याबाबत नागरिकांसह नगरसेविका सुमन निकम व माजी नगरसेवक नितीन निकम यांनी प्रशासनकडे याबाबत पाठपुरावा करत या जागेवरील डेब्रिज हटवून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती अखेर या तक्रारीची दखल घेत पालिका प्रशासनाने डेब्रिज हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे .            कल्याण पूर्वेतील दुर्गामाता सदन या इमारती समोर असलेल्या खाजगी  मोकळ्या जागेतून जाणारा रस्त्यावर मोठ्या प्रमणात कचरा आणि डेब्रिज टाकण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व घाणीचा सामना करावा लागत होता या घाणी मुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता .            हि जागा खाजगी असुन या जागेचा वाद सुरू होता त्यामुळे अनेक वर्षांपासून नाग

पाण्यासाठी मनसेने घातला कार्यालयाला रिकाम्या बाटल्यांचा हार ,

इमेज
पाण्यासाठी मनसेने घातला कार्यालयाला रिकाम्या बाटल्यांचा हार ,           कल्याण ( प्रतिनिधी ):  यावर्षी ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी दमदार पावसामुळे धारण परिसरात समाधानकारक पाणी साठा झाला आहे, मात्र पालिकेच्या ढिसाळ वितरण व्यवस्थेमुळे कल्याण पूर्वेतील बहुतांश भागात आजहि पाणी समस्या कायम आहे .अनेकवेळा आंदोलने निवेदने देवून हि पालिका प्रशासन आश्वासना पलीकडे काहीच कार्यवाही करत नसल्याने आज संतापेल्या मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पालिकेच्या ' ड ' प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला .मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने संतापेल्या मनसेच्या पदाधिकार्यांनी बंद कार्यालयाला रिकाम्या बाटल्यांचा हार घालत निषेध नोंदवला .            यावेळी मनसैनिकाचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनी प्रभाग कार्यलय गाठत सायंकाळी पालिका मुख्यालयात बैठक घेवून तोडगा काढू असे आश्वासन दिले .मात्र यावेळीतरी प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार की पुन्हा आंदोलकाना आश्वासन देऊन गुंडाळले हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे .           यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने बारवी धरण चक्क दोन वेळा ओव्हर फ्

फसवणूक करत वृद्धेची जमीन लाटली पोलिसांकडे न्यायाची मागणी

इमेज
फसवणूक करत वृद्धेची जमीन लाटली पोलिसांकडे न्यायाची मागणी          कल्याण (प्रतिनिधी ) : नवऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीतून वृद्धेला बेदखल करत जमीन हडपली .सदर बाब निदर्शनास येताच या महिलेने थेट प्रांताधीकाऱ्यांकडे दाद मागीतली असता प्रांताधिकार्यांनी या जमिनीच्या ७/१२ वर वृद्धेचे नाव लावण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अनुबाई तरे या महिलेने आपली फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस उपयुक्तांकडे  केली आहे.         अनुबाई तरे यांच्या पतीची कल्याण जवळील वडवली येथे वडिलोपार्जित जमीन होती. मात्र सुमारे 20 वर्षांपूर्वी तरे यांच्या पतीचे निधन झाले त्यानंतर 10 वर्षपूर्वी त्यांच्या सासर्याचे निधन झाले .तरे यांच्या कुटुंबीयांनी पतीच्या वडीलांच्या नावे असलेल्या या जमिनीचे वाटप झालेले नसल्याचा व अनुबाई तरे यांच्या अज्ञानाचा  फायदा घेत इतर सह हिस्सेदारानि तरे यांना या जमिनीतून बेदखल केले त्यानंतर राहत्या घरातून देखील हाकलून दिले होते. यानंतर तरे यांना विश्वासात न घेता या जमीनिची एका नामांकित  बिल्डरला परस्पर विक्री करत तरे यांची फसवणूक केली.          आपली फसवणूक झाल्या

महासभे कडून बडतर्फी रोखण्यासाठी सहा. आयुक्त अनिल लाड यांच्या गाठीभेटी सुरू

इमेज
महासभे कडून बडतर्फी रोखण्यासाठी सहा. आयुक्त अनिल लाड यांच्या गाठीभेटी सुरू कल्याण (  संतोष होळकर) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा करनिर्धारक अनिल लाड यांचे निलंबन करण्यात आले होते. दोन कंपन्यांच्या संचालक मंडळावर असल्याचे सिद्ध झाल्याने अनिल लाड यांना माजी आयुक्त ई रविंद्रन यांनी निलंबित केले होते. त्यांच्या निलंबना नंतरच्या चौकशी मध्ये लाड हे दोषी आढळल्या मुळे त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव लाच प्रकरणात पकडले गेलेल्या अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या बरोबरच  महासभेत ठेवण्यात आला आहे.  १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेत बडतर्फीचा निर्णय होऊ नये यासाठी निलंबित अनिल लाड आता नगरसेवक पदाधिकाऱ्याच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पटविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.  या प्रकरणी अनेक नगरसेवक पदाधिकारी यांनी अनिल लाड यांना शब्द दिला असून तुमचे निलंबन होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्याने येत्या महासभेत अनिल लाड यांचे लाड पुरवणार  अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे. मागे कार्यकारी अभियंता सुनील जोशी हे लाच प्रकरणात दोन वेळा पकडले गेले होते. त्यांना पुन्हा कामाव

आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

इमेज
आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप          कल्याण ;- उच्च शिक्षण घेण्याची घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. तसेच शिक्षणापासून एकही मुल वंचित राहू नये आणि सामाजिक कौटुंबिक गरिबीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला बाधा येऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकीने शालेय साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन समन्वय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष अॅड जनार्दन टावरे यांनी केले....  मुरबाड तालुक्यातील वडाची वाडी, धसई     येथील जिल्हा परिषद शाळेत समन्वय प्रतिष्ठान तर्फे आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड टावरे यांनी सांगितले की, शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी म्हणून आनंददायक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आणि बालकांचे कर्तव्य याची जाणीव करून दिली..त्याचप्रमाणे निसर्ग संपत्तीची वाढ व जतन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने वृक्ष लागवडीचा संदेश देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी  सल्ला दिला... .यावेळी एम.एस.ई.बी. चे सरळगांव

असलेला सिमेंट रस्ता तोडला

इमेज
               पालिकेचा प्रताप असलेला सिमेंट रस्ता तोडला                            कल्याण( संतोष होळकर ):- कल्याण पूर्व मधील नेतीवली चौक ते चक्की नाका या  सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी मोठया प्रमाणावर घोळ सुरू आहे,               गेल्या 10 वर्ष्या पासून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत सिमेंट रस्त्यांची कामे कासवाच्या गतीने सुरू आहेत, पालिकेतील एकही सिमेंट रास्ता आज पर्यंत पूर्ण झालेला नाही, या मुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून झालेल्या रस्त्यांवर मोठया प्रमाणावर भ्रष्ट्राचार मुळे भेगा पडल्या आहेत, या भेगा बुजविण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे,             कल्याण पूर्व मधील नेतीवली ते चक्की नाका या रस्त्याचे काम सुरू असून महापालिकेच्या नेतीवली दवाखाना जवळ सिमेंट चा सुमारे 50 मीटर रस्ता मशनरी लावून तोडण्यात आला आहे, याबाबत आमच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचा नकाशा चुकीचा बनविल्याने तो फारच उंच झाला होता त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना त्याचा त्रास होत असल्याने आम्ही आयुक्तांच्या मंजुरीने कामात दुरुस्ती करीत आहोत काम केल्याने व दुरुस्ती करण्यासाठी ये

डीम्ड कन्व्हेयन्स साठी विशेष मदत केंद्र,-- आमदार नरेंद्र पवार

इमेज
डीम्ड कन्व्हेयन्स साठी विशेष मदत केंद्र,-- आमदार नरेंद्र पवार कल्याण:- ( संतोष होळकर ) कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या डीम्ड कन्व्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) साठी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्य यांचा महामेळावा संपन्न झाला. कल्याण पश्चिममधील तब्बल ४२५ सोसायटींनी व ८११ प्रतिनिधींनी उत्स्फुर्तपणे या महामेळाव्यात सहभाग नोंदवला. नूतन विद्यालयाच्या प्रांगणात हा महामेळावा संपन्न झाला. सामान्य नागरिक कष्टाने कमावलेली आयुष्यभराची पुंजी खर्च करून स्वतःचे हक्काचे घर घेतात, सोसायटी तयार होते. पण जागा मालक व बिल्डर वर्षानुवर्षे त्यांचे जागेवरील हक्क सोडत नाहीत. FSI/TDR घेऊन अवैध बांधकाम करतात. मोफा अॅक्टप्रमाणे कम्प्लेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर संस्था नोंदणीनंतर ६ महिन्याच्या आत बिल्डरने कन्व्हेयन्स डीड करून देणे बंधनकारण केलेले आहे. पण दुर्दैवाने बिल्डर कन्व्हेयन्स डीड करून देत नाहीत. कन्व्हेयन्स डीडसाठी लागणारी कागदपत्रे, होणारा खर्च व कायदेशीर किचकट प्रक्रिया लांबलचक असल्याने फारशा सोसायटी यामध्ये पडत नाहीत. कन्व्हेयन्स डी
इमेज
मोहने महिला मोर्चाचा लोकोपयोगी  उपक्रम आहे,-- आमदार नरेंद्र पवार कल्याण ( प्रतिनिधी): भाजपच्या मोहने टिटवाळा मंडळ महिला मोर्च्या ने अटाळी परिसरातील नागरिकांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर हा लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल आमदार नरेंद्र पवार यांनी महिला कार्यकर्त्यांची वाहवा केली,       महिला मोर्च्या आयोजित नेत्र चिकित्सा शिबीर  कार्यक्रमाचे उदघाटन कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार नरेंद्र पवार व कल्याण जिल्हा भाजपच्या महिला अध्यक्षा उज्वला दुसाने यांनी केले, यावेळी नगरसेविका उपेक्षा भोईर, मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, सरचिटणीस व माजी परिवहन सभापती रमेश कोणकर, शक्तीवान भोईर, गजानन हिरू पाटील शाळेचे अध्यक्ष नारायण पाटील, सरचिटणीस जनार्धन पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, विष्णू पवार, महिला जिल्हा पदाधिकारी मुजुमदार म्याडम, माधुरी जोशी, मल्लिका पुजारी,   स्मिता सारदेशपांडे, ऍड. स्वाती झिमूर, संतोष इंगोले, बल्यानी प्रभाग अध्यक्ष विनायक भगत, मोहने टिटवाळा मंडळ युवा मोर्च्या अध्यक्ष राहुल पाटील , मंडळ उपाध्यक्ष भरत पाटील, प्रमोद घरत आदी मान्यवर उपस्थित होते,        नेत्र

कॉंग्रेस – राष्ट्रवादीने अल्पसंख्यांनाचा वापर वोटबँक म्हणून केला -जमाल सिद्धिकी

इमेज
कॉंग्रेस – राष्ट्रवादीने अल्पसंख्यांनाचा वापर वोटबँक म्हणून केला     -जमाल सिद्धिकी    डोंबिवली :-   भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने डोंबिवलीतील आलेल्या अल्पसंख्याक सवांद यात्रेचे होरीझोन सभागृहात जैन समाजाने स्वागत केले. या समारोह सभेत भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्धिकी यांनी कॉंग्रेस – राष्ट्रवादीने अल्पसंख्यांनाचा वापर वोटबँक समजून केला असून  त्यांना विकासापासून वंचित ठेवल्याची टीका केली.           या सभेत अल्पसंख्यांक मोर्च्याचे महामंत्री एजाज देशमुख, कार्यालय मंत्री फारूक मंत्री, आयोजक तथा विशेष निमंत्रित सदस्य महेंद्र गांधी, मदन खत्री, जैन समाजाचे राकेश कोठारी, राजेश रुपावत, श्रीपाल जैन, सिकंदर रोख, नगरसेविका सायली विचारे, डॉ. सुनिता पाटील, संजय विचारे, शशिकांत कांबळे , राविसिंग ठाकूर, सुरेखा पांडे, यांसह यावेळी मोर्च्याचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्धिकी म्हणाले, कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या सत्तेत जैन समाजला विकासापासून लांब ठेवण्यात आले होते. मात्र भाजप सत्तेत जैन समाजाला न्

कल्याण स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार- महाव्यवस्थापक डी, के, शर्मा,

इमेज
कल्याण स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार- महाव्यवस्थापक डी, के, शर्मा, कल्याण : मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकाला विशेष महत्व आहे. कल्याण हे जंक्शन असून येथून नाशिक व पुणे कडे जाणारी वेगवेगळी लाईन आहेत, येथे क्रॉसिंग रेल्वे मार्ग असल्याने वेळ वाया जातो त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडलिंग करण्यासाठी या रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार असून या कामामुळे लोकलच्या प्रवाशांना निश्चित दिलासा मिळेल अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी  दिली.  कल्याण स्टेशनवर सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा  आले होते, यावेळी विभागीय व्यवस्थापक संजय जैन, सुरक्षा बलाचे आयुक्त सचिन भलोदे, आमदार नरेंद्र पवार,  कल्याण स्टेशन डायरेक्टर विरेश्वर सिंग, स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव यांच्या समवेत मध्य रेल्वेचे विविध विभागाचे अधिकारी, सुरक्षा बलाचे अधिकारी, रेल्वे

सुभाष म्हस्के नवे सभापती

इमेज
सुभाष म्हस्के नवे सभापती कल्याण : कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) सभापती पदाचा पदभार भाजपाचे सुभाष म्हस्के यांनी स्विकारला,  सध्या केडीएमटी अनेक अडचणींमधून जात असून त्यासाठी कर्मचारी, अधिकारी, पालिका पदाधिकारी, परिवहन समिती सदस्य यांना सर्वाना एकत्र घेऊन कामकाज करण्याचा मानस यावेळी म्हस्के यांनी व्यक्त केला.  कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती मध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता असून दोन्ही पक्षाने सभापती पद एक एक वर्ष वाटून घेतले असून त्यानुसार सभापती पदाचा पदभार सुभाष म्हस्के यांनी स्वीकारला. यावेळी पालिका उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक सुरेश पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, स्थायी समिती सभापती राहुल दामले, भाजपा गटनेते वरूण पाटील, परिवहन समिती सदस्य संजय पावशे, संतोष चव्हाण, राजेंद्र दीक्षित, मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, तसेच कल्याण पूर्व मधील भाजपा पदाधिकारी संदीप तांबे, उद्योजक रवी हराळे आदींनी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे नवनिर्वाचित सभापती सुभाष म्हस्के यांचा वाढदिवस होता तो त्यांनी आगळा वेगळा साजरा केला. म्हस्के म्हणाले क

एनआरसी कंपनीच्या कामगारांची 841 कोटीची थकीत देणी लवकरच मिळणार - आमदार नरेंद्र पवार

इमेज
एनआरसी कंपनीच्या कामगारांची 841 कोटीची थकीत देणी लवकरच मिळणार - आमदार नरेंद्र पवार         कल्याण (संतोष होळकर) : एकेकाळी महाराष्ट्रातील रेयॉन धागा उत्पादन करणारी आंबिवली येथील सर्वात मोठी एनआरसी कंपनीकडे असलेली कामगारांची 841 कोटीची देणी मिळावी व कामगारांना न्याय मिळावा या संदर्भात कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकारातून कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्या दालनात बैठक पार पडली. आंबिवली येथील कंपनी २००९ साली बेकायदेशीरपणे बंद करण्यात आली मात्र त्याठिकाणी असणाऱ्या साडेचार हजार कामगारांची पगार आणि देणी न देता हा निर्णय घेतल्याने कामगारांवर प्रचंड अन्याय झाला आहे. कंपनी टाळेबंद होऊन तब्बल नऊ वर्षे झाली आहेत. कामगारांना न्याय देण्यासाठी तातडीने शासनाने यावर कार्यवाही करावी आणि सर्व देणी द्यावी अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी बैठकीत बोलताना केली.              आंबिवली येथील एनआरसी कंपनी २००९ साली बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या पाच ते सहा गावांमधील साडेचार हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार झाले आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि पगार न देता कंपनी बंद करण्यात आली आहे. त
इमेज
हाय

कचऱ्यापासून खत प्रकल्पाचे उदघाटन

इमेज
कचऱ्यापासून खत प्रकल्पाचे उदघाटन     कल्याण (संतोष होळकर): केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरू केले आहे, त्या नुसार कल्याण डोंबिवली महापालिका व सहयोग सामाजिक संस्था यांनी कल्याण मधील 'ड' प्रभाग कार्यालयात ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करण्याच्या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सहयोग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन कल्याण पूर्व पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरात शून्य कचरा अभियानाअंतर्गत बायो कल्चर युनिट सेंद्रीय खत प्रकल्पाचे उदघाटन पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर, प्रभाग समिती सभापती हेमलता पावशे, नगरसेवक राजाराम पावशे, नगरसेविका शितल मंढारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के, प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, उपअभियंता वैद्य, पाणी पुरवठा विभाग उपअभियंता अशोक घोडे, सहयोग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय भोसले, पर्यावरण तज्ज्ञ विनोद दळवी, दिपक लिंगम, आरोग्य निरीक्षक एल. के